शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ज्योत्स्ना चव्हाण यांच्यावरील कार्यवाहीचा 'स्टेटस्को' रद्द

By admin | Updated: November 12, 2014 22:35 IST

जातीचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नगराध्यक्षपदाचा उपभोग घेतल्याप्रकरणी दर्यापूरच्या माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चव्हाण यांनी न्यायालयाकडून मिळविलेला ‘स्टे’ रद्द करण्यात आल्याने

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : आता प्रशासनाच्या कारवाईकडे लक्षदर्यापूर : जातीचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करुन नगराध्यक्षपदाचा उपभोग घेतल्याप्रकरणी दर्यापूरच्या माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चव्हाण यांनी न्यायालयाकडून मिळविलेला ‘स्टे’ रद्द करण्यात आल्याने आता पालिका प्रशासन त्यांच्याविरुध्द काय कारवाई करते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.दर्यापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना रामेश्वर चव्हाण यांनी दर्यापूरच्या नगराध्यक्षपदाकरिता मराठा असताना खोट्या दस्तऐवजांच्या आधारे बनावट जात प्रमाणपत्र सादर केले. त्यावरून जातवैधता प्रमाणपत्र देखील मिळविले. याप्रकरणी न.प.सदस्य अर्चना रवाळे यांनी आक्षेप घेऊन प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले होते. सदर रीट पिटीशन नं. १२५९/१२ मध्ये उच्च न्यायालयाने ज्योत्स्ना चव्हाण यांचे जातवैधता प्रमाणपत्र प्रथमदर्शनी बनावट असल्याचे गृहित धरून पुन:श्च डिव्हीजनल स्क्रुटिनी कमेटीला फेरतपासणीचे निर्देश दिले होते. यानुसार विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. १ अमरावती विभाग अमरावती यांनी याप्रकरणी परिपूर्ण चौकशी, साक्षी पुरावे शोधपथकांमार्फत सखोल शोध घेऊन ३० एप्रिल २०१३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ज्योत्स्ना रामेश्वर चव्हाण यांना उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांनी निर्गमित केलेले कुणबी या जातीचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सांगितले.ज्योत्स्ना चव्हाण यांचे मूळ जात प्रमाणपत्र जप्त करून ते रद्द करण्यात आले. संबंधित अधिनियमातील कलम ११ मधील तरतुदींच्या अनुशंगाने कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. यानंतर ज्योत्स्ना चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुनर्याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने १८ आॅक्टोबर २०१३ रोजी विभागीय जात पडताळणी समितीचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर ज्योत्स्ना चव्हाण यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव पिटीशन नं. ३५६४२/२०१३ दाखल केले होते. त्यावेळी ज्योत्स्ना चव्हाण यांना सर्वोच्च न्यायालयाने स्टेटस्को ‘जैसे थे’ चा आदेश दिला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होऊन ७ नोव्हेंबर २०१४ रोजी ज्योत्स्ना चव्हाण यांच्याविरूद्ध कार्यवाहीस मिळालेला ‘जैसे थे’ आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशासन पुढील कारवाई करू शकते. सुनावणी दरम्यान ज्योत्स्ना चव्हाण यांच्यावतीने पितळे तर अर्चना रवाळे यांच्यावतीने डी.टी. शिंदे व संतोष कोल्हे या वकिलांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)