शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के प्रवेशाचा आदेश डावलणार्‍या शाळांवर कारवाई

By admin | Updated: June 9, 2014 23:22 IST

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २00९ (आरटीई) नुसार जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या १३५ नामवंत शाळांना प्रवेश कोट्याच्या २५ टक्के प्रमाणात आर्थिक, दुर्बल व वंचित घटकामधील

अमरावती : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २00९ (आरटीई) नुसार जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या १३५ नामवंत शाळांना प्रवेश कोट्याच्या २५ टक्के प्रमाणात  आर्थिक, दुर्बल व वंचित घटकामधील बालकांना प्रवेश देण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. ६ मार्चपासून सुरू करण्यात आलेली प्रक्रिया ६ जून २0१४ रोजी संपली. मात्र ८ ते १0 शाळा वगळता अन्य शाळांनी या प्रवेश प्रक्रियेचा  अहवाल सादर केला नसल्याने तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी दिला आहे. या प्रक्रियेत वंचित बालकांच्या प्रवेश प्रक्रियेत नियम डावलणार्‍या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे शिक्षण विभाग (प्राथमिक) यांनी स्पष्ट केले आहे.जिल्ह्यामधील आर्थिक दुर्बल घटकामधील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, शारीरिक व्यंग, तसेच एक लाखाचे आत उत्पन्न असणार्‍या पालकांच्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश देणे जिल्ह्यामधील १६७ शाळांना बंधनकारक केले होते. यामध्ये अमरावती शहर व तालुक्यामधील ७0 शाळांचा समावेश आहे. मात्र या विषयीचे पुरावे पालकांना सादर करावे  लागले होते. अल्पसंख्यक  समाजाच्या शाळा वगळता उर्वरित शाळांना २५ टक्के प्रवेशाची ६ मार्च ते ६ जून २0१४ दरम्यान राबविलेल्या या स्पेशल ड्राईव्हच्या प्रक्रियेसंदर्भातील अहवाल १२५ शाळांनी अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे व्यावसायिकाच्या स्पर्धेत वंचित घटकांना डावलने या शाळांना आता महागात पडणार आहे. शिक्षणाधिकार्‍यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश या शाळांना बजावले आहेत.शिक्षण विभागाने बंधनकारक केलेली प्रक्रिया राबविण्यास नामवंत इंग्रजी शाळांनी राबविण्यास कुचराई केल्यास शिक्षण विभाग कोणती कारवाई करतो याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)