मध्यप्रदेशातून दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST2021-07-16T04:10:59+5:302021-07-16T04:10:59+5:30

अमरावती : मध्यप्रदेशातून तीन व पुसला येथून एक अशा चार दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला दुचाकीसह अटक केली. त्या मुद्देमालाची किंमत ...

Accused arrested for stealing two-wheeler from Madhya Pradesh | मध्यप्रदेशातून दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत

मध्यप्रदेशातून दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत

अमरावती : मध्यप्रदेशातून तीन व पुसला येथून एक अशा चार दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला दुचाकीसह अटक केली. त्या मुद्देमालाची किंमत २ लाख ४० हजार एवढी असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी केली.

सोहेल खान मोहम्मद इरफान (१९, रा. जहांगीर पुरी, के ब्लॉक, दिल्ली ह. मु. विष्णोरा ता. मोर्शी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेंदूरजना घाट येथील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकींच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर मात्र आठ ते दहा दिवसांपूर्वी पुसला येथून सदर दुचाकी चोरल्याचे पोलसांना सांगितले. त्यानंतर त्याने आणखी तीन दुचाकी मध्यप्रदेशातून चोरल्याची कबुुली दिली. त्यापैकी एका दुचाकीचोरीचा गुन्हा मध्यप्रदेशातील पांढुर्णा ठाण्यात दाखल आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर, जमादार दीपक उईके, दीपक सोनाळकर, युवराज मानमोठे, अमित वानखडे, चेतन दुबे, नीलेश डांगोरे, चालक तेलगोटे यांच्या पथकाने केली.

Web Title: Accused arrested for stealing two-wheeler from Madhya Pradesh