अमरावती : जिल्हा वकील संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अॅड. प्रशांत देशमुख यांनी अॅड. अनिल विश्वकर्मा यांचा अवघ्या ७ मतांच्या फरकाने पराभव करत विजय संपादन केला. ३० एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानानंतर, १ मे रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया सलग १५ तास अखंडपणे सुरू होती. या मॅरेथॉन मतमोजणीनंतर शुक्रवारी पहाटे निकाल स्पष्ट झाला.
अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या तीन उमेदवारांमध्ये मुख्य लढत अॅड. प्रशांत देशमुख आणि अॅड. अनिल विश्वकर्मा यांच्यातच पाहायला मिळाली. अॅड. देशमुख यांना ६६३ मते मिळाली, तर अॅड. विश्वकर्मा यांना ६५६ मतांवर समाधान मानावे लागले. तिसरे उमेदवार अॅड. धनराज साधवाणी यांना केवळ १५ मते मिळाली. अवघ्या सात मतांच्या फरकाने निकाल लागल्याने शेवटच्या क्षणापर्यंत वकील वर्गात मोठी उत्सुकता आणि धाकधूक निर्माण झाली होती.
Web Summary : Prashant Deshmukh won the Amravati Bar Association election, defeating Anil Vishwakarma by a narrow margin of just seven votes. The intense race concluded after a 15-hour vote counting process. The election saw significant anticipation among lawyers.
Web Summary : प्रशांत देशमुख ने अमरावती बार एसोसिएशन का चुनाव जीता, अनिल विश्वकर्मा को सिर्फ सात वोटों के मामूली अंतर से हराया। 15 घंटे की मतगणना के बाद तीव्र मुकाबले का समापन हुआ। चुनाव में वकीलों के बीच काफी उत्सुकता देखने को मिली।