शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बनावट पास तयार करणारे रॅकेट? विद्यार्थ्यांनो व्हा सजग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:50 IST

एसटी महामंडळाने तपासले १३,५०० पास : एका विरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ग्रामीण भागातून अमरावती येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे बनावट पास निदर्शनास आली. महेंद्र कॉलनी येथील १९ वर्षीय युवक बनावट पास बनवून देत असल्याचे त्या विद्यार्थ्याने सांगितले. त्यावरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात त्या युवकाविरुद्ध तक्रार देण्यात आली. ऑगस्टमधील तक्रारीवरून पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यापूर्वी याबाबीच्या मुळाशी जाण्यासाठी जिल्ह्यातील १३,५०० प्रवास सवलत पास एसटी महामंडळाच्या विविध पथकांनी तपासून काढल्या.

पोलिस सूत्रांनुसार, शिवजित गजानन पवार (१९, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमरावती आगारात कार्यरत महिला अधिकाऱ्याने याप्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात १६ ऑगस्टला तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार, माहुली येथून अमरावतीकरिता बसलेल्या एका विद्यार्थ्यांची पासची तपासणी केली तेव्हा संशय आल्याने ती पास जवळ बाळगून त्या विद्यार्थ्याला वाहकाने आगारातील महिला अधिकाऱ्याच्या समक्ष उपस्थित केले. पास बनावट असल्याची खात्री झाल्यावर त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता, शिवजित पवारसह काही जण हा तशा प्रकारच्या बनावट एसटी पास बनवून देतो, असे पुढे आले. 

२२-२३ ऑगस्टला तपासणी मोहीमजिल्ह्यातील १३ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी पासमधून काही बनावट आहेत का, याची तपासणी मोहीमच अमरावती आगाराने २२- २३ ऑगस्ट रोजी राबविली. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगाराच्या ठिकाणी तपासणी पथके पाठविण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येतून चार ते पाच पास या बनावट आढळून आल्याच. त्यामुळे संशयाच्या आधारे अमरावती आगाराकडून गाडगेनगर पोलिसांत तक्रार देऊन कारवाईची मागणी करण्यात आली.

"काही विद्यार्थ्यांकडे रंगीत, झेरॉक्स स्वरूपात तसेच काही पास या दुसऱ्या ठिकाणाहून छपाई करून घेतल्याचे निदर्शनास येते का, याची तपासणी पथकाने केली. विद्यार्थी अल्पवयीन असल्याने यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य होते. पोलिसांनी याबाबत पुढील कारवाई करावी."- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती आगार (एसटी)

टॅग्स :Amravatiअमरावती