शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९ हजार २८७ कुटुंब नियोेजन शस्त्रक्रिया

By admin | Updated: August 23, 2014 23:43 IST

जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनातर्फे कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आखल्या जातात. काही अंशी हे कार्यक्रम यशस्वी होतात.

अमरावती : जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनातर्फे कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आखल्या जातात. काही अंशी हे कार्यक्रम यशस्वी होतात. परंंतु आजही या कार्यक्रमांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र नाही. गेल्या वर्षी शासनाकडून जिल्हा कुटुंब नियोजन विभागाला १० हजार ६३ शस्त्रक्रियांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकीे ९ हजार २८७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण महिलांचे असून या शस्त्रक्रियेबाबत पुरूष मात्र अद्यापही उदासीन दिसून येत आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्या तुलनेत कुटुंब नियोजनाचे कार्य थंडबस्त्यात आहे. गेल्या वर्षात ९ हजार २८७ जणांवर कुटुंब नियोजनातून शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यामध्ये केवळ ७०० पुरुषांनीच सहभाग दर्शविला आहे. केवळ ७ टक्के पुरुषांचा कुटुंब नियोजनात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.या वर्षा धारणी, चांदूररेल्वे, धामणगांवरेल्वे या तालुक्यामध्ये एकही महिला किंवा पुरुषांपैकी एकानेही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली नाही, हे विशेष. जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, धारणीमध्ये उपजिल्हा रुग्णालय, अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, चिखलदरा, वरुड, धामणगांव रेल्वे, तिवसा, चुर्णी तसेच नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालये या व्यतिरिक्त ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जिल्ह्यात ४ सेवानिवृत्त तसेच ७ डॉक्टर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी कार्य करीत आहेत. धामणगांव चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर तसेच तिवसा येथे एकही चिकित्सक नसल्याचे समजते.