जिल्ह्यात ९ हजार २८७ कुटुंब नियोेजन शस्त्रक्रिया

By Admin | Updated: August 23, 2014 23:43 IST2014-08-23T23:43:08+5:302014-08-23T23:43:08+5:30

जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनातर्फे कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आखल्या जातात. काही अंशी हे कार्यक्रम यशस्वी होतात.

9,827 families Neo-surgery in the district | जिल्ह्यात ९ हजार २८७ कुटुंब नियोेजन शस्त्रक्रिया

जिल्ह्यात ९ हजार २८७ कुटुंब नियोेजन शस्त्रक्रिया

अमरावती : जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनातर्फे कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आखल्या जातात. काही अंशी हे कार्यक्रम यशस्वी होतात. परंंतु आजही या कार्यक्रमांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र नाही. गेल्या वर्षी शासनाकडून जिल्हा कुटुंब नियोजन विभागाला १० हजार ६३ शस्त्रक्रियांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकीे ९ हजार २८७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण महिलांचे असून या शस्त्रक्रियेबाबत पुरूष मात्र अद्यापही उदासीन दिसून येत आहेत.
जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्या तुलनेत कुटुंब नियोजनाचे कार्य थंडबस्त्यात आहे. गेल्या वर्षात ९ हजार २८७ जणांवर कुटुंब नियोजनातून शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यामध्ये केवळ ७०० पुरुषांनीच सहभाग दर्शविला आहे. केवळ ७ टक्के पुरुषांचा कुटुंब नियोजनात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.या वर्षा धारणी, चांदूररेल्वे, धामणगांवरेल्वे या तालुक्यामध्ये एकही महिला किंवा पुरुषांपैकी एकानेही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली नाही, हे विशेष. जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, धारणीमध्ये उपजिल्हा रुग्णालय, अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, चिखलदरा, वरुड, धामणगांव रेल्वे, तिवसा, चुर्णी तसेच नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालये या व्यतिरिक्त ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जिल्ह्यात ४ सेवानिवृत्त तसेच ७ डॉक्टर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी कार्य करीत आहेत. धामणगांव चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर तसेच तिवसा येथे एकही चिकित्सक नसल्याचे समजते.

Web Title: 9,827 families Neo-surgery in the district