शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात ३१ दिवसांत ९१ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला, कर्जमाफीनंतरही थांबेना आत्महत्यांचे सत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 16:20 IST

बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने कर्जमाफी केली; मात्र त्याचा फायदा किती शेतक-यांना मिळाला, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने कर्जमाफी केली; मात्र त्याचा फायदा किती शेतक-यांना मिळाला, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. जगावे कसं? या विवंचनेत शेतक-यांच्या संघर्षावर नैराश्य भारी ठरत आहे. याचमुळे व-हाडात यंदा जानेवारी महिन्यात ९१ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे भीषण वास्तव आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात  ३१ जानेवारी २०१८ पर्यंत १४ हजार ७४९ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ६०७ प्रकरणे पात्र, ८ हजार ३७ अपात्र, तर १४५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा जानेवारी महिन्याच्या ३१ दिवसांत ९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३, अकोला ११, यवतमाळ १८, बुलडाणा २८, वाशिम ३ व वर्धा जिल्ह्यात ९ शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला. विभागात दरदिवशी तीन कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. शेतकरी आत्मत्यप्रवण म्हणून ओळख असलेले अमरावती, यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात आत्महत्या कमी झाल्या असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र शेतकरी आत्महत्येच सत्र सुरू आहे.अपुरा पाऊस, बोंडअळीचा प्रकोप, सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज यासह अन्य यासह अन्य कारणांमुळे शेतक-यांना नैराश्य येत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगाव कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे. दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच असल्याचे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. 

मृत्यूनंतरही शेतकरी कुटुंबांची उपेक्षाचविभागात सन २००१ पासून १४ हजार ७८९ शेतक-यांच्या अत्महत्या झाल्यात यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक आठ हजार सात प्रकरणात शासकीय मदत नाकारण्यात आली. मृत्यूपश्चातही शासनाच्या अनास्थेने बळीराजाच्या पदरी उपेक्षाच आलेली आहे. दीड दशकातनंतरही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना फक्त एक लाखाची मदत मिळत आहे. त्यातही ३० हजार बँक खात्यात, तर उर्वरित ७० हजार पाच वर्षांसाठी संयुक्त खात्यात ड्रॉफ्ट स्वरूपात आहे. त्यामुळे कुटुंबाचा कर्ता गमावल्यानंतर त्या परिवाराला कामाला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी