शहरात 10 महिन्यात 6,444 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:36+5:30

तीन वर्षाचा आढावा घेता, सन २०१८ मध्ये ४ हजार ९३३, सन २०१९ मध्ये ५ हजार २५२ नागरिकांचा मृत्यू झाला. यंदाच्या १० महिन्यांतच ही दोन्ही संख्या पार करीत ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.  यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. यामध्ये जिल्ह्याच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १२ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.

6,444 deaths in 10 months in the city | शहरात 10 महिन्यात 6,444 जणांचा मृत्यू

शहरात 10 महिन्यात 6,444 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे दररोज सरासरी २२ मृत्यूची नोंद, तीन वर्षातील सर्वाधिक आकडा

  गजानन मोहोड
    लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आठ लाख लोकसंख्येच्या शहरात यावर्षी १० महिन्यांत तब्बल ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाब धक्कदायक आहे. या काळात शहरात दररोज सरासरी २२ मृत्यूची नोंद झाल्याची महापालिकेची आकडेवारी आहे. कोरोना संसर्गामुळे यंदा २५१ मृत्यूची भर पडल्याचे वास्तव यामध्ये समोर आले आहे.
 तीन वर्षाचा आढावा घेता, सन २०१८ मध्ये ४ हजार ९३३, सन २०१९ मध्ये ५ हजार २५२ नागरिकांचा मृत्यू झाला. यंदाच्या १० महिन्यांतच ही दोन्ही संख्या पार करीत ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.  यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. यामध्ये जिल्ह्याच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १२ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. एकूण संक्रमितांच्या तुलनेत २.१० टक्के रुग्णांचा मृत्यू उपचारादरम्यान झाल्याने यंदा मृतांचा आकडा वाढल्याचे वास्तव आहे.

यंदा सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात
यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झाला. सर्वाधिक ९२० मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. या महिन्यात दररोज ३१ व्यक्ती दगावले. यामध्ये कोरोना संसर्गासह विविध आजार व नैसर्गिक मृत्यूमुळेही  या महिन्यात मृत्युदर वाढला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ऑक्टोबर महिन्यात ८७६ मृत्यू झाले आहेत.

काेराेना व इतर उपचार न मिळाल्याने वाढ
दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मृत्युसंख्या थोड्या प्रमाणात वाढली आहे. केवळ कोरोनाच नव्हे, तर अन्य कारणेदेखील मृत्यूसाठी कारणीभूत आहेत. या विविध कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. 
- डॉ. विशाल काळे 
वैद्यकीय आरोग्य अधिकारी

Web Title: 6,444 deaths in 10 months in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.