महापालिकेतील ६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले

By Admin | Updated: September 7, 2016 00:14 IST2016-09-07T00:14:29+5:302016-09-07T00:14:29+5:30

अग्रीम राशीचे समायोजन न केल्याने महापालिकेतील ६४ अधिकारी -कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे.

The 64 employees of the municipal corporation, pay salaries of the employees | महापालिकेतील ६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले

महापालिकेतील ६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले

अग्रीम समायोजनात लेटलतिफी : ८७ लाखांची रक्कम अंगावर 
प्रदीप भाकरे अमरावती
अग्रीम राशीचे समायोजन न केल्याने महापालिकेतील ६४ अधिकारी -कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी नोंदविलेल्या निरीक्षणानंतर लेखा विभागाने हा कारवाईचा दंडुका उगारला .
एखादा कार्यक्रम किंवा एखादे काम करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी अग्रीम रक्कम उचलतात. त्या कामाला येणारा अंदाजे खर्च विचारात घेता अ‍ॅडव्हांस म्हणून घेतलेल्या त्यारकमेला अग्रीम असे संबोधले जाते. या अग्रीम रकमेचे समायोजन करणे बंधनकारक आहे. अर्थात त्या अग्रीम रकमेतून नेमका कोणता खर्च करण्यात आला, त्यासंबंधाने संपूर्ण हिशेब देणे अभिप्रेत आहे. त्या खर्चाच्या पावत्याही देणे बंधनकारक आहे. उदा.शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला २० हजार रुपये खर्च अपेक्षित असेल तर अग्रीम म्हणून तेवढी रक्कम घेतली जाते. कार्यक्रम झाल्यानंतर त्या २० हजार रुपयांचा हिशेब देऊन त्या रकमेचे समायोजन केले जाते. मात्र, महापालिकेतील बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांनी या समायोजनाला फाटा दिल्याने ८६.६१ लाख रुपयांच्या अग्रीमाचे समायोजन रखडले आहे. काहींनी यात आर्थिक अनियमिततेचा संशयही व्यक्त केला आहे. तीन ते चार वर्षांपासून त्या अग्रीम रकमेच्या हिशेबात ताळतंत्र न राहिल्याने ८७ लाख रुपयांचा प्रशाासकीय घोळ घालण्यात आला. अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर शेटे यांनी त्या फाईलची तपासणी केली. त्यावेळी ही लेटलतिफी उघड झाली. त्यानंतर संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्यात. अग्रीम रकमेचे समायोजन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले.बरहुकूम मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी ६४ जणांचे जुलै महिन्याचे वेतन रोखले आहे.वेतन रोखल्याने संबंधितांची आंतरिक तगमग वाढली आहे. काहींनी ती रक्कम भरण्याची तयारी चालविली असून काहीजण अधिकाऱ्यांचे दालनाचे उंबरठे झिजविण्यात धन्यता मानत आहेत.विभागप्रमुख आणि कर्मचारी ८७ लाख रुपयांचा भरणा नेमका केव्हा करतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अतिरिक्त आयुक्तांचे पत्र
महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी वर्ग वेळोवेळी अग्रीम घेत असतात. त्या रकमेचे समायोजन होणे आवश्यक असते. मात्र, बऱ्याच विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांनी त्यांनी घेतलेल्या अग्रीम रकमेचे समायोजन केलेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याचा ठपका अतिरिक्त आयुक्तांनी ठेवला आहे. या अग्रीम राशीचे समायोजन १५ दिवसांत करावे, अशा सूचना त्यांनी मुख्य लेखापरीक्षकांना दिल्या आहेत.

Web Title: The 64 employees of the municipal corporation, pay salaries of the employees