शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

५७ टक्केच शाळा प्रगत !

By admin | Updated: April 10, 2017 00:12 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल करून तेथे ‘ई-लर्निंग’ वर भर देण्यात येत असून

कासवगती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाला बाधाअमरावती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल करून तेथे ‘ई-लर्निंग’ वर भर देण्यात येत असून या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमामुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळांचा गुणवत्तेचा स्तर उंचावत असला तरी जिल्ह्यात मात्र शाळांच्या प्रगतीची गती मंदावल्याचे आकडेवारीवरू न दिसृून येते. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५७ टक्केच शाळा शंभर टक्के प्रगत झाल्याचे दिसते. शासनाने २२ जून २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. याउपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, त्याच्या शैक्षणिक प्रगतीचे चाचणीच्या माध्यमातून मूल्यमापन करणे, भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, ज्ञानरचनवाद शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. शाळा डिजिटल करून चार विद्यार्थ्यांमागे एक ‘टॅबलेट’ देऊन त्यांना स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील ७० ते ८० टक्के शाळा प्रगत आहेत. यातुलनेत जिल्ह्यातील शाळांच्या प्रगतीची गती अतिशय मंद आहे. ‘शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमा’स शहरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात अगदी Þउलट परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या प्रगतीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्याचा निष्कर्ष प्राप्त आकडेवारीवरून काढला जाऊ शकतो. जिल्ह्यातील १,६०१ प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांपैकी अर्ध्या शाळासुद्धा प्रगत झाल्या नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५७ टक्के शाळाच प्रगत झाल्या आहेत. या उपक्रमाला शिक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्राथमिक शाळांच्या प्रगतीचा टक्का घसरला आहे. याकारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी आणि शिक्षकांपुढे उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.तालुकानिहाय प्रगत शाळाअमरावती ६३, भातकुली ७८, अचलपूर १०३, नांदगाव खंडेश्र्वर ९०, अंजनगाव सुर्जी ३८, दर्यापूर ५७, चांदूरबाजार ५६, वरूड ६८, मोर्शी ४२, चांदूररेल्वे ६७, धामणगांव रेल्वे ६६, तिवसा ५८, धारणी ५५, चिखलदरा ६२, प्राथमिक शाळा ६१४ आणि उच्च प्राथमिक अशा २९० शाळा प्रगत झाल्या आहेत. जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ६०१ शाळांपैकी ९०४ शाळांची प्रगती झाल्याचे शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.जिल्ह्यातील शाळांची प्रगती संथगतीने होत आहे, असे म्हणता येणार नाही. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. शाळांच्या प्रगतीची गती कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.- एस.एम.पानझाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक