शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्टारंट अँड बारसमोर ओळखीच्या व्यक्तींकडूनच ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या, मारेकऱ्यांचे चेहरे उलगडले, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 20:55 IST

ओळखीतील व्यक्तींनी राजकुमार यांचा खून केल्याचे सीसीटिव्हीतून स्पष्ट झाले असले तरी मारेकरी फरार झाल्याने हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.            

अमरावती : रहाटगाव परिसरातील एका रेस्टॉरेन्ट ॲन्ड बारसमोर ५५ वर्षीय व्यक्तीची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. १२ जुलै रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास ती घटना घडली. राजकुमार तहलराम सुंदरानी (५५, रा. रामपुरी कॅम्प, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. ओळखीतील व्यक्तींनी राजकुमार यांचा खून केल्याचे सीसीटिव्हीतून स्पष्ट झाले असले तरी मारेकरी फरार झाल्याने हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.            नांदगाव पेठ पोलिसांनी मृताचा भाऊ प्रकाश सुंदरानी (६४) यांच्या तक्रारीवरून १२ जुलै रोजी दुपारी २.१७ च्या सुमारास संशयित बंटी पवार (३०, रा. विलासनगर) आणि शिवा फुलवानी (४२, रा. रामपुरी कॅम्प) या दोघांसह त्यांच्या इतर साथीदाराविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. राजकुमार यांना घरी भेटायला येणाऱ्या शिवा फुलवानी व अन्य काही मित्रांना आपण ओळखत असल्याचे प्रकाश यांनी फिर्यादीत म्हटले आहे. राजकुमार सुंदरानी हे मोठे भाऊ प्रकाश, आई व इतर सदस्यांसोबत राहत होते. ते अविवाहित होते. मिळेल ती मजुरी करणाऱ्या राजकुमार यांना दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे किरकोळ काम करुन मिळालेल्या पैश्यातून दारु प्यायची आणि रात्री बेरात्री ते घरी यायचे.एफआयआरनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता बंटी पवार, शिवा फुलवानी हे घरासमोर आलेत. त्यानंतर या दोघांसह राजकुमार घरुन निघून गेले. दरम्यान शनिवारी सकाळी ८.३० वाजता राजकुमार यांचे मोठे बंधू प्रकाश सुंदरानी आपल्या घरी हजर असताना पोलिसांनी राजकुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. राजकुमार यांच्या मांडीवर चाकूचा घाव असून यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस