शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आठ विधानसभा क्षेत्रांत वाढले ५२ हजार मतदार

By admin | Updated: July 30, 2014 23:46 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनर्निरीक्षण व नवीन मतदार नोंदणी अभियान ९ जून ते ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे. निवडणूक विभागाच्या मोहिमेला जिल्ह्यात व्यापक

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनर्निरीक्षण व नवीन मतदार नोंदणी अभियान ९ जून ते ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे. निवडणूक विभागाच्या मोहिमेला जिल्ह्यात व्यापक प्रतिसाद लाभला. यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांत ५१ हजार ८२६ मतदार वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे हजारो मतदारांना त्यांचा घटनात्मक अधिकार बजावता आला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग आले. जिल्हाधिकाऱ्यांपासून निवडणूक आयोगापर्यंत याविषयीच्या तक्रारी झाल्या. यासर्व प्रकाराची आयोगाने गंभीर दखल घेतली. अशा सर्व मतदारांना तसेच नवीन मतदारांना नाव नोंदणी करण्याची पुन्हा संधी देण्यात आली. जिल्हा निवडणूक विभागाकडे तक्रारी करणाऱ्या ११५० तक्रारकर्त्यांच्या मोबाईलवर निवडणूक विभागाद्वारे थेट संपर्क साधून त्यांना मतदार यादीत नाव नोंदणीचा नमुना ६ देखील देण्यात आला. तसेच मतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात ‘स्विप’ उपक्रमांतर्गत प्रचार, प्रसार व जनजागृती करण्यात आली. तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान मतदार नाव नोंदणीचे अर्ज पुरविण्यात आले. परिणामस्वरूप जिल्ह्यात ५१ हजारांवर मतदार वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे, असे दिसते. (प्रतिनिधी)