शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय पुरस्कारासाठी ५० टक्के गुण अनिवार्य

By admin | Updated: September 21, 2015 00:10 IST

ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार..

३० सप्टेंबर ‘डेडलाईन’ : ग्रंथालय पुरस्काराच्या अटी, शर्थीत बदलअमरावती : ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्काराच्या अटी व शर्थीमध्ये बदल करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी आता ५० टक्के गुण प्राप्त करणारे ग्रंथालय, ग्रंथालय कार्यकर्ते व ग्रंथालय सेवक पात्र ठरणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकृती सुरू असून ३० सप्टेंबर ही स्वीकृतीची अंतिम मुदत राहील. ग्रंथालय चळवळीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रंथालयांना शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, उत्कृष्ट कामगिरी करणारे कार्यकर्ता व ग्रंथालय सेवकांना डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.यासंदर्भातील पूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करून पुरस्काराबाबत अटी, निकष, निवड प्रक्रिया आणि सुधारित कार्यपद्धती निश्चित करून सुधारित नियम निर्गमित करण्यात आली आहे, पुरस्काराबाबतच्या अटी व गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या तसेच किमान ५० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांनाच पुरस्कारास पात्र ठरविले जाईल. एखाद्या वर्षी प्राथमिक अटी व निकषांची पूर्तता होत नसल्यास तसेच ज्या पुरस्कारात किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक नसेल त्यावर्षी तो पुरस्कार दिला जाणार नाही. ग्रंथालयास एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार मिळाल्यानंतर व ग्रंथालय सेवक कार्यकर्त्यास डॉ.एस.आर. रंगनाथन पुरस्कार मिळाल्यानंतर सदर पुरस्कारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही. प्राथमिक अटीचा भंग झाल्यास पुरस्कार व अनुषंगिक सोयीसुविधा परत घेण्यात येऊन संबंधितावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट २०१५ रोजी घेतला आहे. (प्रतिनिधी)