शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरातून ५० लाखांचे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:01 IST

राजदीप ज्वेलर्सचे संचालक दीपक प्रांजळे हे गुरुवारी सकाळी १०.२० च्या सुमारास दुकानात आले. त्यांनी दुकानाची स्वच्छता केली. ती आटोपल्यानंतर झाडू कपाटाच्या मागे ठेवण्याकरिता गेले असता एका तरुणाने त्यांच्या दुकानात कपाटाजवळ ठेवलेली सोन्याची दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढला. त्यांनी लगोलग दुकानाच्या बाहेर येऊन शोध घेतला व पोलिसांना घटनेची माहिती दिली.  ज्वेलरी शॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने पोलिसांनी रस्त्यालगत असलेल्या अन्य दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

ठळक मुद्देराजदीप ज्वेलर्समधील घटना, चोर सीसीटीव्हीत कैद

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : बनोसा स्थित राजदीप ज्वेलर्समधून ४० ते ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास लंपास करण्यात आली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्याने प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याचे संकेत पोलिसांनी दिले.  ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. राजदीप ज्वेलर्सचे संचालक दीपक प्रांजळे हे गुरुवारी सकाळी १०.२० च्या सुमारास दुकानात आले. त्यांनी दुकानाची स्वच्छता केली. ती आटोपल्यानंतर झाडू कपाटाच्या मागे ठेवण्याकरिता गेले असता एका तरुणाने त्यांच्या दुकानात कपाटाजवळ ठेवलेली सोन्याची दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढला. त्यांनी लगोलग दुकानाच्या बाहेर येऊन शोध घेतला व पोलिसांना घटनेची माहिती दिली.  ज्वेलरी शॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने पोलिसांनी रस्त्यालगत असलेल्या अन्य दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात क्रीम कलरचा शर्ट घातलेला, पायात काळ्या रंगाचे बूट असलेला अंदाजे २० वर्षे वयाचा मुलगा विश्वकर्मा ज्वेलर्सकडे पळत जाताना दिसत असल्याचे लक्षात आले. विश्वकर्मा ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तो मुलगा त्या ठिकाणाहून दुचाकीवर दोन व्यक्तींसोबत जाताना दिसत आहे. दर्यापूर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून पुढील तपाससासाठी स्थानिक गुन्हे शाखेला पाचारण केले. पुढील तपास अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांचे पथक करीत आहेत. 

गुरुवारी सकाळी १०.२५ दरम्यान दुकान उघडल्यानंतर सफाई करीत असताना सोन्याची बॅग दुकानातील कपाटाजवळ ठेवली होती. कपाटामागे फडा ठेवण्याकरिता  गेलो तोच चोराने बॅग लंपास केली. बॅगमध्ये एक किलोच्या जवळपास सोन्याचे दागिने होते.  - दीपक प्रांजळे, संचालक, राजदीप ज्वेलर्स  

सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन यापूर्वीच सराफा दुकानदारांना केले होते. सदर घटनेचा तपास वेगवेगळ्या दिशेने सुरू आहे. लवकरच चोराला गजाआड केले जाईल. - तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस