शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कर्जमुक्तीसाठी ४७१५ कोटी आवश्यक; पश्चिम विदर्भाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 6:21 PM

६ लाख ८४ हजार शेतकरी थकबाकीदार

अमरावती : पश्चिम विदर्भात ६ लाख ८३ हजार ८४४ शेतकरी दोन लाखांपर्यंत थकबाकीदार असल्याचे बँकांच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी किमान ४७१५ कोटी ४० लाख पाच हजार रुपये आवश्यक आहेत. अद्यापही ३५ हजार ५९२ शेतकऱ्यांनी खाते आधारशी लिंक केले नसल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण आहे. 

सलग दुष्काळ, नापिकी यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला व बँकांचा थकबाकीदारदेखील झालेला आहे. यामधून शेतकरी सावरावा व त्याला शेतीसाठी कर्जपुरवठा मिळावा, त्याची विस्कटलेली घडी सावरावी, यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमक्ती योजनेद्वारे दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय नागपूरच्या अधिवेशनात घेतला. या योजनेत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरित झालेले व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत कर्ज असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

योजनेच्या अनुषंगाने सोसायटी व बँक स्तरावर दोन लाखांपर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये अमरावती विभागातील ६ लाख ८३ हजार ८४४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकºयांची ४७१५ कोटींची कर्जफेड झालेली नाही. ज्या शेतकºयांनी आधार बँकेशी संलग्न केलेले नाही, अशा शेतकऱ्यांच्या याद्या गावात सोसायटी व बँकांमध्ये लावण्यात आलेल्या आहेत व ज्या शेतकºयांचे आधार लिंक आहेत, त्यांची माहिती १ ते २८ कॉलममध्ये भरण्याची प्रक्रिया युद्धस्तर सुरू आहे. ही माहिती ३१ जानेवारीला शासनाद्वारे जाहीर पोर्टलमध्ये भरण्यात येणार आहे.कर्जमुक्तीसाठी विभागाची सद्यस्थिती (लाखात)जिल्हा         खातेदार    थकबाकी    आधार बाकीअमरावती    १२२१५०    ९३५९२.००    ११७५५अकोला     ११३८४९    ७७५८४.४३    ३१४४यवतमाळ    १३७९१५    ८३३१२.६३    ९५९०बुलडाणा    २००९४०    १४०७४४    ७३८८वाशीम        १०८९९०    ७६३०६.९९    ३७१५एकूण        ६८३८४४    ४७१५४०.०५    ३५५९२प्रधान सचिवांच्या उपस्थितीत आज कार्यशाळा

कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधार लिंकिंग, विहित नमुने भरणे आदी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेबाबत विभागस्तरीय कार्यशाळा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेला विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपनिबंधक, अग्रणी बँक व्यवस्थापक उपस्थित राहतील.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भ