शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

४०० किलो कागदी लगद्यापासून साकारला १६ फुटांचा गणपती

By admin | Updated: May 25, 2016 00:46 IST

स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी ४०० किलो कागदाचा लगदा आणि ६५० किलो मैद्याच्या चिक्कीचा वापर करून भिंतीवर चक्क १६ फुटांच्या गणपतीची प्रतिमा साकारली.

स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विक्रम : ‘लिम्का बुक’ला पाठविले रेकॉर्डिंग अमरावती : स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी ४०० किलो कागदाचा लगदा आणि ६५० किलो मैद्याच्या चिक्कीचा वापर करून भिंतीवर चक्क १६ फुटांच्या गणपतीची प्रतिमा साकारली. ही देशातील सर्वात मोठी प्रतिमा असल्याचा दावा स्कूल आॅफ स्कॉलर्सने केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. सोमवारी दहा जणांच्या कला पथकला ही प्रतिमा भिंतीवर साकारण्यासाठी ७ तास ३० मिनिटांचा कालावधी लागला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी यासाठी लिम्का बुककडे नोंदणी करून घेतली होती. त्याला मान्यताही मिळाली होती. एसओएसचे दोन कलाशिक्षक व आठ विद्यार्थ्यांच्या चमूने सकाळी ८.५० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत न थांबता ही विशाल प्रतिमा तयार केली. या विक्रमाचे निरीक्षक म्हणून शहरातील विविध विभागात कार्यरत राजपत्रित अधिकारीदेखील याठिकाणी उपस्थित होते. या विक्रमाचे पूर्ण व्हिडीओ शूटिंगदेखील करण्यात आले. हे फुटेज आता लिम्का बुककडे पाठविली जाणार आहे. त्यानंतरच ही देशातील सर्वात मोठी गणपती प्रतिमा आहे किंवा नाही, हे स्पष्ट होईल. यासाठी शाळा व्यवस्थापनाला ३५हजार रूपये खर्च आला. याप्रसंगी सहायक शिक्षणाधिकारी जयश्री घारफळकर, लता सोनारकर, पुरवठा विभागाचे उपायुक्त रमेश मावस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन उंडे, प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समीधा नाहार, हरिहर जिराफे, विनोद इंगोले, मुख्याध्यापिका प्रिया कडू, डीवायएसपी ग्रामीण सुगंधी, एस.आर.धुर्वे, प्राचार्य देशमुख, नीलय वासाडे, पांडुरंग काळमेघ, अजय सोळंके, रिना रोहणकर, दिलीप तिडके, नीरज डाफ, गणेश विश्वकर्मा उपस्थित होते. विक्रमात यांचा होता सहभागकुणाल राजणेकर व रूपेश भेले यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी अनुदय पर्वतकर, स्वानंद जाजू, प्रियांक धरमशी, जयवंत इंगळे, आकाश अवघड, साहिल घुबळे, अथर्व जोशी आणि प्रतिक सुगंधी यांनी मागील १५ दिवसांपासून सतत प्रयत्न करून ४०० किलो कागद गोळा करून ही प्रतिमा साकारली.