शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस महासंचालक कार्यालयातून आदिवासींची ३९८ पदे बेपत्ता; अधिसंख्य १ हजार २३१ अन् रिक्त केवळ ८३३ पदे!

By गणेश वासनिक | Updated: February 15, 2025 21:44 IST

अनुसूचित जमातींची ३९८ राखीव पदे बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे...

अमरावती : राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे बळकावलेली अनुसूचित जमातीची १ हजार २३१ पदे अधिसंख्य केली; परंतु रिक्त केवळ ८३३ पदे दाखविली आहेत. अनुसूचित जमातींची ३९८ राखीव पदे बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.पोलिस महासंचालक मुंबई कार्यालयात गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गात एकूण मंजूर पदे १ लाख ५८ हजार १२३ आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी १३ हजार ६१५ पदे राखीव दाखविण्यात आली आहेत. जातवैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या १२ हजार ९७५ आहे. तब्बल २ हजार ६९ जणांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही.राखीव अन् भरलेल्या पदांमध्ये तफावत -पोलिस महासंचालक कार्यालयात अनुसूचित जमातीच्या राखीव व भरलेल्या पदात स्पष्ट तफावत आढळली आहे. अनुसूचित जमातीसाठी १३ हजार ६१५ पदे राखीव दाखविण्यात आली असून भरलेल्या पदांची संख्या १५ हजार ४४ दाखविण्यात आली आहे. तब्बल १ हजार ४२९ पदांची तफावत आहे.बेपत्ता पदांचा छडा लावून पदे भरण्याचे आव्हानराज्यातील पोलिस महासंचालक कार्यालयात बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे जातीची चोरी करणाऱ्यांनी आदिवासी समाजाची बळकावलेली राखीव पदे, त्यातही बेपत्ता झालेल्या ३९८ पदांचा छडा लावून पदे भरण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री योगेश कदम (गृह शहरे ), राज्यमंत्री पंकज भोयर (गृह ग्रामीण) यांच्यापुढे आता उभे ठाकले आहे.कोणतीही चोरी केली की तो गुन्हा ठरतो. खुद्द पोलिस महासंचालक कार्यालयात बनावट जातप्रमाणपत्र सादर करून आमच्या घटनात्मक हक्काची १ हजार २३१ पदे बळकावली आहेत. अशांवर पोलिस महासंचालक जातपडताळणी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत. ३९८ बेपत्ता झालेल्या पदांचा छडा लावून आदिवासी समाजाला न्याय द्यावा. विशेष पदभरती मोहीम राबवण्यात यावी.- अरविंद वळवी, राज्य संघटक, ट्रायबल फोरम

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस