शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

४३ अतिरिक्त शिक्षकांना अखेर मिळाली नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ मधील संचमान्यतेनुसार तालुकास्तरावरील अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीसाठी १८ सप्टेंबरला तालुकास्तरावर पंचायत समितीत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतरही अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे जिल्हास्तरावर सीईओंच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने समुपदेशनाद्वारे नियुक्तीची प्रक्रिया राबविली.

ठळक मुद्देतिढा सुटला : समुपदेशनाद्वारे मेळघाटात पदस्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार तालुकास्तरावर अतिरिक्त ठरलेल्या तसेच सन २०१९ मधील आॅनलाइन बदली प्रक्रियेतील अतिरिक्त ठरलेल्या ४३ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे मेळघाटसह अन्य ठिकाणी रिक्त जागांवर नियुक्तीची प्रक्रिया २० सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत पार पडली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी नितीन उंडे आदींनी सन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार पदस्थापना देऊन हा तिढा निकाली काढला.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ मधील संचमान्यतेनुसार तालुकास्तरावरील अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीसाठी १८ सप्टेंबरला तालुकास्तरावर पंचायत समितीत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतरही अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे जिल्हास्तरावर सीईओंच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने समुपदेशनाद्वारे नियुक्तीची प्रक्रिया राबविली. ४३ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील रिक्त जागांवर नियुक्ती देण्यात आली. यामध्ये पदवीधर, सहायक शिक्षक, मुख्याध्यापक आदी मराठी व उर्दू माध्यमातील शिक्षकांचा समावेश आहे.यावेळी नितीन उंडे, संदीप बोडखे आदी अधिकाऱ्यांसह तुषार पावडे, ऋषीकेश कोकाटे, राजीव झाकर्डे, सुभाष चव्हाण, गजानन कोकाटे, दिनेश बांबल, विनोद विखार आदीसह सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.अनुशेष भरुन निघालासन २०१८-१९ च्या संचमान्यतेनुसार तालुकास्तरावर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समुदपदेशनाद्वारे पदस्थापना देण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये बहुतांश शिक्षकांना मेळघाटातील रिक्त असलेल्या शाळांतील जागांवर नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे प्रशासकीयदृष्ट्या मेळघाटातील सहायक शिक्षकांचा रिक्त पदांचा अनुशेष कमी झाल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षक