शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गात सारीचे 2128 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

सर्दी, ताप, खोकला याशिवाय श्वसनास त्रास आदी सर्व कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे सारीवर आरोग्य यंत्रणाद्वारे विशेष लक्ष देण्यात आले. किंबहुना याविषयी राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सारी रुग्णांसाठी स्वतंत्र वाॅर्ड व स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेस केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा  सामान्य रुग्णालयात स्वतंत्र तीन वाॅर्ड व येथील पीडीएमसी रुग्णालयात दोन वाॅर्डांत सारीच्या रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचाचण्यांमध्ये ४१३ कोरोना पॉझिटिव्हची नोंद

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाकाळात कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या ‘सारी’ (सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी ईलनेस) आजाराचे तब्बल २,१२८ रुग्ण जिल्हाभरात आढळून आले आहेत. यापैकी ४१३ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला व १६ रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, सारी आजारानेही २५० वर रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण कोरोनाच्या डेथ रेटच्या १० पट अधिक आहे. सर्दी, ताप, खोकला याशिवाय श्वसनास त्रास आदी सर्व कोरोनासदृश लक्षणे असल्यामुळे सारीवर आरोग्य यंत्रणाद्वारे विशेष लक्ष देण्यात आले. किंबहुना याविषयी राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील यांचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सारी रुग्णांसाठी स्वतंत्र वाॅर्ड व स्वतंत्र नोंदी ठेवण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेस केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा  सामान्य रुग्णालयात स्वतंत्र तीन वाॅर्ड व येथील पीडीएमसी रुग्णालयात दोन वाॅर्डांत सारीच्या रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत सारीच्या १,९९८ रुग्णांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४१३ नमुने पॉझिटिव्ह आले. २५० रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कोरोनाचे १८,५९५ रुग्ण असताना ३८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.   सप्टेंबर ते ऑक्टोबर या ३१ दिवसांत सारीच्या ७७५ रुग्णांची नोंद झाली आहे. 

सारीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डजिल्ह्यात अधिक प्रमाणात सारीच्या रुग्णांची नोंद होत असल्याने कोरोना संसर्गाच्या सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारासाठी स्वतंत्र दोन वाॅर्डांची व्यवस्था करण्यात आली. रुग्णसंख्या वाढताच पुन्हा एक वाॅर्ड सुरू करण्यात आला. याशिवाय पीडीएमसीतदेखील सारी आजारासाठी दोन वाॅर्ड तयार करण्यात आले. या वाॅर्डसाठी स्वतंत्र आरोग्य कर्मचारी व वाॅर्डात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा करण्यात आली आहे.

सध्या सारीचे रुग्ण कमी येत आहेत. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण जास्त होते. या आजाराच्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र तीन वाॅर्ड व पीडीएमसीमध्ये दोन वाॅर्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येते. यामध्ये ४१३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या