शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

ेविद्यार्थ्यांनी बनविली पक्ष्यांसाठी २०० घरटी

By admin | Updated: May 18, 2015 00:18 IST

पर्यावरण पे्रेमी, ध्येयवेडया शिक्षकाने विद्यार्थ्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करुन टाकाऊ पृष्ठापासून पक्ष्यांसाठी २००.....

रामकृष्ण क्रीडा विद्यालयात उपक्रम : पक्षिमित्र शिक्षकाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेशअमरावती : पर्यावरण पे्रेमी, ध्येयवेडया शिक्षकाने विद्यार्थ्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करुन टाकाऊ पृष्ठापासून पक्ष्यांसाठी २०० घरटी बनविली. रामकृष्ण क्रीडा विद्यालयातील कला शिक्षक पी.आर.पाटील यांनी हा उपक्रम राबविला असून त्यातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पी.आर.पाटील सामाजिक वनीकरण विभाग, राष्ट्रीय हरित सेना व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या प्रेरणेतून पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवित आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि अन्न मुबलक प्रमाणात मिळू शकत नाही. त्यामुळे पक्षी मानवी वस्तीवर अवंलबुन राहतात. पक्ष्यांचा निसर्ग संवर्धनात बहुमोल वाटा आहे. त्यामुळे पक्षी वाचविणे हे मानवाचे कर्तव्यच आहे. अशी भावना ठेवून पी.आर. पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून पक्षी संवर्धनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांनी पक्षी संवर्धनाचे कार्य स्वत:च्या घरापासूनच सुरु केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचा मुलगा शंतनू पाटील यानेही घराच्या आवारात पक्ष्यांना आश्रय देऊन पक्षी संवर्धनाचे कार्य सुरु केले आहे. शिक्षक पाटील हे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत निसर्ग संवर्धनाचे धडे सुध्दा देत आहेत. पाटील यांनी हरित सेनेच्या माध्यमातून एक हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनात सहभागी केले आहे. उन्हाळा सुरु होण्याआधीच पाटील यांनी पक्ष्यांसाठी घरटे बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली. विद्यार्थ्यांनी विविध टाकाऊ साहित्य गोळा करुन पक्ष्यांसाठी सुंदर घरटी बनविली आहेत. ही घरटी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात लावण्याचा संकल्प आहे. हा उपक्रम हव्याप्रमंचे पदाधिकारी देखील राबवित आहेत. पक्षी संवर्धन उपक्रम घराघरांपर्यंत पोहोचविणारनिसर्ग संवर्धनाचा उपक्रम घराघरांपर्यंत पोहोचविण्याचा मानस पी.आर. पाटील यांचा आहे. त्यांनी पक्षी संवर्धनासाठी भित्तीपत्रके तसेच पोस्टर तयार केले असून ते शहरातील विविध भागांत लावण्यात येत आहे. घराजवळ पक्षी राहू शकतील, असे वातावरण निर्माण करा. पक्ष्यांना धोका निर्माण करु नका, स्वयंपाक घरातील उरलेले खाद्यपदार्थ पक्ष्यांना खायला द्या, पक्ष्यांसाठी स्वच्छ पाणी ठेवा, पक्ष्यांसाठी घरटी तयार करा, अशा आशयाची रंगीत चित्रे व पोस्टर्सही त्यांनी बनविली आहेत.