शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१८ टक्के नागरिक पितात दूषित पाणी

By admin | Updated: November 11, 2014 22:31 IST

जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे

जिल्ह्यात आजार वाढले : पाणी शुद्धीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्षवैभव बाबरेकर - अमरावतीअमरावती : जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोतांच्या नमुने तपासणीमध्ये १८ टक्के पाणी दूषित आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाणी शुध्दीकरणाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्ह्यात विविध आजार वाढत आहेत. पाणी हे जीवन आहे. अन्नाशिवाय माणूस काही दिवस तग धरु शकतो. मात्र पाण्याशिवाय माणुस जिवंत राहणे कठीणच. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते ८० टक्के आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. शासनास्तरावर दूषित पाण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्याकरिता विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. मात्र काही वर्षात जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे आजारही वाढत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात ५ हजारांवर पाण्याचे स्त्रोत आहेत. यापैकी काही पाण्याच्या स्त्रोतातील नमुन्यांची अनुजीव तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत केली जाते. काही वर्र्षांमध्ये प्रयोग शाळेत तपासणीकरिता आलेल्या पाणी स्त्रोतामध्ये १५ टक्क्यांच्यावर पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. हे पाणी पिल्याने सर्वाधिक आजार बळावण्याची शक्यता असते. दूषित पाण्यामुळे जिल्ह्याभरात आरोग्य समस्य उद्भवली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेत आॅक्टोबर महिन्यात २ हजार ३६८ पाण्याचे नमुने तपासणीकरिता आले होते. त्यापैकी ४३३ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी १८.२८ असल्याचे प्रयोग शाळेतील तज्ज्ञांनी सांगितले.२६२ गावांमध्ये दूषित पाणीजिल्हा परिषेदेच्या पाणीपुरवठा विभागातंर्गत ग्रामीण भागातील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात ८१९ गावे असून त्यापैकी २६२ गावांमधील पाणी स्त्रोताचे नमुने दूषित आढळून आले आहेत. ५ लाख ४० हजार नागरिक पितात दूषित पाणीअमरावती जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेच्या अहवालानुसार १८. २८ टक्के पाणी दूषित आढळून आले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ५ लाख ४० हजार नागरिक दूषित पाणी पित असावे, असा अंदाज काही तज्ज्ञांनी काढला आहे.