शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१६७० चालक-वाहकांचा दररोज ८५ हजार प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष; कर्मचारी स्वतः घेतात काळजी अमरावती : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने ड्युटीवर असलेल्या वाहकांचा रोजच ...

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष; कर्मचारी स्वतः घेतात काळजी

अमरावती : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने ड्युटीवर असलेल्या वाहकांचा रोजच प्रवाशांची संपर्क येतो. दररोजच्या प्रवासात अनेक गावे आणि प्रवाशांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना सर्वाधिक धोका पत्करून सेवा बजावावी लागते. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चालक-वाहकांचा धोकादेखील वाढला आहे.

जिल्ह्यामध्ये लॉकडाऊननंतरच्या काळात दरदिवशी एक लाखांवर प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस नव्याने संचारबंदी लागू झाल्यानंतर ८५ हजारांवर प्रवासी घेऊन ने-आण करीत आहेत. या प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक आणि चालक कोरोना कालावधीत सर्वाधिक संक्रमित होऊ शकतात. यामुळे कोविड-१९ सारख्या आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. असे केले, तरच वाहक आणि चालक सुरक्षित राहतील. त्याच्याकडून इतरांनाही धोका होणार नाही किंवा इतरांकडून त्यानाही कोरोनाची लागण होणार नाही. गावखेड्यातून शहरात प्रवासी घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुरक्षित होईल, याकरिता आरोग्य विभागाने एसटी कर्मचाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेता, प्राधान्याने आरोग्य, महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लस उपलब्ध करून देण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे.

विशेष म्हणजे, एसटी वाहक-चालकांना लस देण्याबाबत अद्यापही कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही. मात्र, कोरोना लसीकरणाबाबत एसटी महामहामंडळाकडून जिल्हा प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार केला जात आहे. अमरावती विभागात एसटी महामंडळाचे ८०१ चालक, ८६९ वाहक कार्यरत आहेत. ‘एसटीचा प्रवास - सुरक्षित प्रवास’ हे बीद्र वाहणाऱ्या एसटी बसचे चालक-वाहक मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या काळातही आपल्या जिवाची पर्वा न करता प्रवाशांशी वाहतुकीच्या माध्यमातून संपर्कात आहेत. मात्र, कोरोना लसीपासून ते वंचित असल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

बॉक्स

वाहक ८६९

चालक ८०१

रोजच्या फेऱ्या १८००

बॉक्स

लसीकरण होणार कधी?

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणारे आणि फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या एसटी चालक-वाहकांच्या लसीकरणासाठी विभाग नियंत्रक कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, लसीकरणाबाबत एसटी कर्मचाऱ्यांचा अजून विचार झालेला नाही. त्यामुळे त्यांना लसीचे संरक्षण अद्याप मिळालेले नाही.

बॉक्स

मास्क, सॅनिटायझरवर होणारा खर्च

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क, हॅन्ड सॅनिटायझर स्थानिक पातळीवर घेण्याच्या सूचना मिळाले आहेत. एसटीमध्ये निर्जंतुकीकरण करून तिला सुरक्षित करण्यात येते. यामुळे प्रवासीही सुरक्षित राहण्यास मदत होऊन प्रवाशांचा संसर्गापासून बचाव होऊ शकतो. जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी हँड सॅनिटायझर स्थानिक पातळीवरून पुरविण्यात आले आहे.

बॉक्स

८५ हजार प्रवाशांचा रोज प्रवास

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून गत काही दिवसांपासून ८५ हजारांवर प्रवासी प्रवास करतात. वाहक आणि चालक दररोज त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट गडद झाले आहे. त्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरणाची गरज आहे.

बॉक्स

तपासणीच नगण्य

कोरोनायोद्धा म्हणून डॉक्टर, पोलीस, महसूल कर्मचारी आशा यांना प्रथम तपासणी करून लसीकरण करण्यात आले. मात्र, सर्वाधिक जनसंपर्क असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना तपासणी केली नाही. त्यांना लसीकरणासाठी लसही अद्याप उपलब्ध झाली नाही.

कोट

विभागीय कार्यालयाकडून आठ आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यांना औषध उपचार करण्यासाठी उपाययोजना करण्यासह लसीकरणासंदर्भात महामंडळाकडून जिल्हा प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला आहे. यामुळे यावर व्यवस्था होण्याची शक्यता आहे.

श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

कोट

दररोज हजारो प्रवाशांच्या संपर्कात एसटीचे चालक-वाहक दररोज येतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही शासनाने कोरोना लसीकरणासाठी प्राधान्य देऊन लस द्यावी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे.

- बाळासाहेब राणे, विभागीय सचिव, कामगार सेना

एसटी कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात टाकून दरोज लाखो प्रवाशांची वाहतूक करावी लागते. त्यामुळे संपर्कही अधिक राहतो. ही बाब लक्षात घेता, एसटी चालक-वाहकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कोरोना लस देण्यात यावी.

- ज्ञानेश्वर खोंड, चालक