शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

जूनपर्यंत १४१.२५ दलघमी साठा शिल्लक

By admin | Updated: May 12, 2016 00:09 IST

जिल्ह्यातील मुख्य व माध्यम अशा १० जल प्रकल्पांत जून २०१६ अखेरपर्यंत केवळ १४१.२५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे.

धोक्याची घंटा : ४८.६१ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व्ययअमरावती : जिल्ह्यातील मुख्य व माध्यम अशा १० जल प्रकल्पांत जून २०१६ अखेरपर्यंत केवळ १४१.२५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. यापैकी ४८.६१ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी २८.४३ व उन्हाळी हंगामासाठी १३.०७ दलघमी पाणी आवश्यक असल्याने मान्सूनने हुलकावणी दिल्यास जिल्ह्यात पाणी-टंचाईची स्थिती उद्भवणार आहे.जिल्ह्यातील प्रमुख उर्ध्व वर्धा प्रकल्पात जलाशयातील पाण्याची नियोजनानूसार जूनअखेरपावेतो ८७.७५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. परंतु या साठ्यापैकी २९.८३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व पाणीपुरवठा योजनांसाठी २०.३३ तसेच उन्हाळी हंगामाकरिता १० दलघमी पाण्याचा वापर होत असल्याने या प्रकल्पात जेमतेमच जलसाठा शिल्लक राहणार आहे. शहापूर मध्यम प्रकल्पात ४६.०४ दलघमी प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत जूनअखेरपावेतो केवळ १०.८१ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार अहे. उपलब्ध साठ्यापैकी ५.५६ दलघमी साठ्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी ४.८० दलघमी पाणी वापर होणार असल्याने प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. सपन प्रकल्पात जून २०१६ अखेर १३.६६ दलघमी जलसठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये ५.०६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल. पूर्णा प्रकल्पात जूनअखेर ६.५७ दलघमी साठा शिल्लक राहणार आहे. यापैकी १.३८ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व पाणीपुरवठा योजनेला १.१५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात प्रकल्पीय साठा ४१.२५ दलघमी आहे. यापैकी जून अखेर पावेतो १३.६५ दलघमी साठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये २०१५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व १.३३ दलघमी पाण्याचा पाणी पुरवठा योजनासाठी वापर होणार असल्याने पावसाळ्यापूर्वी पाण्याची भीषण समस्या उद्भवणार आहे. पावसाळ्यापूर्वी लघु प्रकल्पात ठणठणाट ४२ लघु प्रकल्पात प्रकल्पीय उपयुक्त साठ्याच्या तुलनेत जून अखेर पावेतो ४.२१ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये २.८७ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन ०.८८ दलघमी पाणी योजनासाठी वापरले जाणार असल्याने पावसाळ्यापूर्वीच हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे.