माहुली प्रकरणात १४ अटक

By Admin | Updated: September 22, 2015 00:31 IST2015-09-22T00:31:19+5:302015-09-22T00:31:19+5:30

माहुली जहागीर येथील उद्रेकांनतर १४ दिवसांनी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले होते. रविवारी १४ माहुलीवासीयांना ...

14 arrests in Mahuli case | माहुली प्रकरणात १४ अटक

माहुली प्रकरणात १४ अटक

न्यायालयात पेशी : तीन दिवस पोलीस कोठडी
अमरावती : माहुली जहागीर येथील उद्रेकांनतर १४ दिवसांनी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले होते. रविवारी १४ माहुलीवासीयांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
माहुलीत १५ जुलै रोजी साहिल डायरेचा बसगाडी आल्याने मृत्यू झाल्यावर उद्रेकाला सुरुवात झाली होती. घटनेच्या चौदा दिवसांनी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले होते. आतापर्यंत पोलिसांनी १० आरोपींना अटक केली होती. रविवारी पुन्हा १४ जणांना अटक करण्यात आली आहे. गजानन अखिलकर, गजानन रायते, आकाश गुल्हाने, अक्षय वणवे, निलेश काळकर, अशोक शेलोकार, महेश सोनोने, संजय उमेका, बाबू लायडर, अतुल जवंजाळ, प्रवीण काळकर, निलेश साबळे, गजानन डायलकर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. जाळपोळ व लुटपाट प्रकरणातील हे आरोपी असून त्यांची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत.
आतापर्यंत पोलिसांनी २४ आरोपींना अटक करुन चौकशी केली आहे. या प्रकरणी आणखी ५० आरोपी अटक होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.

दंडाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी माहुली प्रकरणात दडांधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहे. त्याकरिता उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे चौकशी करीत आहेत. आतापर्यंत तीन माहुलीवासियांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या असून पोलीस निरीक्षक हिंमगिरे यांनीही चौकशी अहवाल सादर केला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत ही चौकशी सुरु राहणार असून त्यानंतर कारवाईचा निकाल घोषित केला जाणार आहे.

जाळपोळ व लुटमार प्रकरणात १४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. त्यांनी लुटपाट केलेले साहित्य जप्त करण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत. याप्रकरणात आणखी बरेचसे आरोपी अटक करण्यात येईल.
-प्रकाश हिंगमिरे, प्रभारी पोलीस निरीक्षक, माहुली ठाणे.

Web Title: 14 arrests in Mahuli case