अकोला : जुने शहरातील गाडगेनगरामध्ये राहणार्या ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. जुने शहरातील गाडगेनगरातील ३२ वर्षीय देवानंद गुलाबराव होनाडे या युवकाने कीटकनाशक विषारी औषध प्राशन केल्याने त्याला शुक्रवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; शनिवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. कौस्तुभ शेखर यांच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}