छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून सकाळी ६ वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी अशोक तापडिया यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक वृषभ तिवसकार, द्वितीय क्रमांक प्रशिश थेटे, तृतीय क्रमांक संजय झाकणे, तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी रामकिसन आहेवार, द्वितीय क्रमांक दीपाली शाळीग्राम भावे, तृतीय क्रमांक वैदेही उमेश ईखार यांनी पटकाविला. त्याच बरोबर मुलांसाठी ८ व मुलींसाठी १० प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेत ५५ वर्षीय बंडू चवरे या स्पर्धकाने १० कि.मी.ची स्पर्धा पूर्ण करून लक्ष वेधले. बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्ष डॉ.गोपाल ढोले, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार राजेश गुरव, डॉ.अशोक तापडिया, राम घंगाळ, राम पाऊलझगडे, शांतिकुमार सावरकर, राजेंद्र कोरडे, लोणकर आदी उपस्थित होते. (फोटो)
तेल्हारा येथे मॅरेथॉन स्पर्धेला युवकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST