पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:06 IST2020-06-02T16:02:58+5:302020-06-02T19:06:04+5:30

किसन पूर्णाजी पाटेकर असे मृतकाचे नाव आहे.

Youth murderd over land dispute at Palsod village of Akola | पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या

पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या

ठळक मुद्देपळसोद येथील दोन शेजाऱ्यांचा मंगळवारी दुपारी वाद झाला.डोक्यावर फावड्याने वार करण्यात आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविला.


अकोट/ दहीहांडा : जागेच्या वादातून युवकाची हत्या केल्याची घटना अकोट तालुक्यातील पळसोद येथे २ जून रोजी दुपारी घडली.  किसन पूर्णाजी पाटेकर असे मृतकाचे नाव आहे.  अकोला जिल्ह्यात हत्यांची मालिका सुरूच असून ९ दिवसांत हा आठवा खून झाला आहे.  
दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पळसोद येथील शेजारी राहणाºया पाटेकर कुटुंबांमध्ये जागेवरून वाद सुरू होता. मंगळवारी सागर गणेश पाटेकर व लखन पूर्णाजी पाटेकर यांच्यामध्ये जागेवरून वाद झाला. वाद वाढत असल्याने किसन पूर्णाजी पाटेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सागर गणेश पाटेकर, रवी गणेश पाटेकर, गणेश पूर्णाजी पाटेकर यांनी  किसन पाटेकर व लखन पाटेकर यांना फावड्याने मारहाण केली. यामध्ये दोन्ही भावंडे गंभीर जखमी झाले. दोघांनाही  दहीहांडा पोलिसांनी तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी किसन पाटेकर यास  मृत घोषित केले. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी सागर गणेश पाटेकर, रवी गणेश पाटेकर, गणेश पूर्णाजी पाटेकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हेकॉ दयाराम राठोड, पोकॉ सुभाष वाघ, विजय सावदेकर करीत आहेत.  

Web Title: Youth murderd over land dispute at Palsod village of Akola