वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:26+5:302021-02-05T06:14:26+5:30

नकाशी येथील महेश मानकर पाटील यांनी रस्त्याचे काम दुरुस्ती करण्यात यावे, अशी मागणी सबंधित विभागाकडे एका निवेदनातून केली होती. ...

Work on Wadegaon-Akola road stalled! | वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले!

वाडेगाव-अकोला मार्गाचे काम रखडले!

नकाशी येथील महेश मानकर पाटील यांनी रस्त्याचे काम दुरुस्ती करण्यात यावे, अशी मागणी सबंधित विभागाकडे एका निवेदनातून केली होती. तसेच दोन दिवसांत काम सुरू करण्यात येईल. असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. ग्रामस्थांनी पुन्हा सबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कामास प्रारंभ करण्यात आला होता. परंतु आज रोजी या रस्त्याचे काम रस्त्यावरील कामासाठी असलेल्या वाहनांमध्ये डिझेलचा पुरवठा नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी या रस्त्यावरील कामाचे वाहन व कामगारांना काम नसल्याने मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरील काम बंद असून, रस्ता खोदून ठेवल्याने, प्रवासी-ग्रामस्थांना धुळीचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्ता कामास प्रारंभ करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Web Title: Work on Wadegaon-Akola road stalled!