शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:35 IST

प्रिती महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देअप्पू पॉइंटजवळ भरधाव येत असलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये प्रिती महल्ले यांचा जागीच मृत्यू झाला.

अकोला : बोरगाव मंजू येथे बँकेत कर्तव्यावर जात असलेल्या एका दुचाकीस्वार महिलेचा भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अकोला ते बाभूळगाव जहांगिर दरम्यान शुक्रवारी सकाळी घडली. प्रिती तक्षक ओळंबे- महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
अकोल्यातील कौलखेड भागात राहणाºया प्रिती ओळंबे-महल्ले या बोरगाव मंजू येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कार्यरत असून, त्या नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आपल्या एम एच ३० ए एक्स ३१४८ क्रमांकाच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडे जात असताना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अप्पू पॉइंटजवळ भरधाव येत असलेल्याअज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये प्रिती  यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात