शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

रब्बी हंगामात सिंचनासाठी १४० दलघमी पाणी सोडणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:38 PM

अकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे, मोर्णा, निर्गुणा, उमा तीन मध्यम तर २९ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातील १४० दशलक्ष घनमीटर पाणी यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामात सहा पाळीत सोडण्यात येणार आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : जिल्ह्यातील धरणात २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात २३ हजार हेक्टरवरील पिके फुलणार आहेत.जिल्ह्यात काटेपूर्णा, वान हे दोन मोठे, मोर्णा, निर्गुणा, उमा तीन मध्यम तर २९ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातील १४० दशलक्ष घनमीटर पाणी यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामात सहा पाळीत सोडण्यात येणार आहे. वान धरणाचे पाणी १२ नोव्हेंबरपासून सोडण्यात येत आहे. या धरणातून पाणी सोडण्याची पहिली पाळी संपली असून, दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे. वान धरणात आजमितीस ७२.६५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यावर्षी यातील ४३ दलघमी जलसाठा पिकांना पाणी देण्यासाठी सोडण्यात येणार आहे. यापैकी आतापर्यंत १.५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात ६३.८६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. या धरणातूनही १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येत आहे. सहा पाळीत हे पाणी सोडण्यात येणार असून, आतापर्यंत ११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात १०.६० दलघमी साठा आहे. या धरणातून यावर्षी सहा पाळीत पाणी सोडले जात आहे. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणात २६.९२ दलघमी जलसाठा आहे. या धरणातूनही सहा पाळीत पाणी सोडण्यात येत आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणात २०.२४ दलघमी जलसाठा असल्याने या धरणाच्या क्षेत्रातील शेतीला तीन टप्प्यातच पाणी सोडण्यात येणार आहे. मागील काही वर्षांत या धरणातून पाणी सिंचनासाठी मिळाले नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामातील पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. यावर्षी वºहाडातील पाच जिल्ह्यांपैकी अकोल्यातील धरणातील पाणीसाठा बºयापैकी आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी पिकांना पाणी सोडण्यात येत आहे.

- जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्प मिळून २१६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. यापैकी १४० दलघमी पाणी सहा टप्प्यात सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.नयन लोणारे,शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीDamधरणagricultureशेती