शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणी उलटण्याच्या वाटेवर

By admin | Updated: August 2, 2014 23:35 IST

शेतकर्‍यांना पावसाची प्रतिक्षा

सिंदखेडराजा : जून, जुलै संपुन ऑगस्टही उजाडला तरीसुद्धा पावसाची हुलकावणीच असल्यामुळे शेतकर्‍यांनी केलेली दुबार पेरणीही आता उलटण्याच्या वाटेवर आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी चिंतातुर झाला असून, तालुक्यातील शेतकर्‍यांना पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या अशा पल्लवीत झाल्या. तालुक्यात फेब्रुवारी मार्च मध्ये झालेल्या गारपिटीने रब्बीचा हंगाम हातचा निघुन गेला. ज्यांनी खरिपाची पेरणी मृग नक्षत्रात एका पावसावर केली, ती पेरणी पावसाच्या दडीमुळे पुर्णत: उलटली. कपाशी तर वखरून टाकण्यात आली. कपाशी लागवडीचा मोसम निघून गेला. त्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला. नुकतेच सोयाबीनचे पीक जमिनीतुन वर आले आहे. परंतू पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे सोयाबीन पिकही सुकू लागले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे सुरू केले आहे. त्यातही अनियमित विद्युत पुरवठा असल्याने चार तासही पिकाला पाणी मिळत नाही. निसर्ग तर कोपलाच परंतू, वीज वितरणही शेतकर्‍यांशी खेळत आहे. तालुक्यात सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद, ज्वारी या खरीप पिकाच्या ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येणार्‍या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरण्या उलटल्याशिवाय राहणार नाही.

** १५ हजार शेतकर्‍यांनी काढला पीक विमा दुष्काळाच्या छटा उमटत असल्याने तालुक्यातील १५ हजार शेतकर्‍यांनी ३१ जुलै पर्यंत पीक विमा उतरविला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची मुदत वाढल्याने पुन्हा त्यात भर पडणार आहे. पीक विम्याचे संरक्षण हा एकमेव आधार शेतकर्‍यांना तारणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.