शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीचे पूरपीडित मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 16, 2014 12:30 IST

दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी अजूनही अनेक पूरपीडितांना शासकीय मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

 
मूर्तिजापूर: गतवर्षी अतवृष्टीमुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर येऊन त्यात अनेक शेतकर्‍यांची शेतजमीन पिकांसह खरवडून गेली होती. या प्रकाराला दहा महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी अजूनही अनेक पूरपीडितांना शासकीय मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात अतवृष्टी होऊन तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला होता. या पुरामुळे नदी व नाल्यांच्या काठावरील शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. पूर्णा नदीकाठावर शेत असणार्‍यांचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली व पूरग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाचे आदेशही निर्गमित करण्यात आले होते. पालक मंत्र्यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. तालुका प्रशासनाला पूरपीडितांना वाटप करावयाचे अनुदान चार ते पाच महिन्यांपूर्वीच मिळाल्याची माहिती आहे. दप्तर दिरंगाईमुळे गतवर्षी पावसाळय़ात नुकसान झालेले शेतकरी या वर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतरही शासकीय मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. चालू वर्षात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अवघ्या दोन महिन्यात शासकीय मदत मिळाली; परंतु गतवर्षीच्या पूरपीडितांना अद्यापपर्यंत मदत मिळालेली नसल्यामुळे शासनाच्या धोरणात असा विरोधाभास का, असा प्रश्न शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे. शेतकर्‍यांनी खरीपपूर्व मशागतीला प्रारंभ केला असून, बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी त्यांना पैशांची गरज आहे. या गरजेच्या काळात तरी शासनाने पूरपीडितांना मदत जारी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
(तालुका प्रतिनिधी) गतवर्षी पुराची झळ बसलेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी १२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ कोटी रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. 
- गजेंद्र मालठाणे, 
तहसीलदार, मूर्तिजापूर