शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या निकषांची प्रतीक्षा!

By admin | Updated: June 13, 2017 00:41 IST

पाच एकरापेक्षा जास्त जमीन : ७३ हजार शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी ठरू शकतात पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह निकषांच्या आधारे सरसकट कर्जमाफीला शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सरकाकडून दिली जाणारी सरसकट कर्जमाफी कोणकोणत्या निकषांच्या आधारे दिली जाणार, याबाबत पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या जिल्ह्यातील ७३ हजार ४०० शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासोबतच निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत ११ जून रोजी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. सरसकट कर्जमाफीमध्ये जिल्ह्यातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेले ७३ हजार ४०० शेतकरी पात्र ठरू शकतात; मात्र सरकारकडून दिली जाणारी सरसकट कर्जमाफी निकषांच्या आधारे देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या निकषांच्या आधारे कर्जमाफी देण्यात येणार आणि निकषांच्या आधारे किती शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी पात्र ठरणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.निकषांसह कर्जमाफीच्या आदेशाकडे लक्ष!सरसकट कर्जमाफी निकषांच्या आधारे देण्यात येणार आहे, त्यामुळे कोणकोणत्या निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार, याबाबत निकष सरकारकडून केव्हा जाहीर करण्यात येणार आणि निकषांच्या आधारे दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयालयासह संबंधित यंत्रणांना केव्हा प्राप्त होणार, याकडेही आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.कर्जमाफीसाठी पात्र अल्पभूधारक शेतकरी!अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या २ लाख ४३ हजार ९५० अल्पभूधारक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामध्ये अकोला-५६९४०, बाळापूर -२९३७१, पातूर -२५९५९, मूर्तिजापूर -३४०१३, बार्शीटाकळी -२८८३३, आकोट-३९३४० व तेल्हारा तालुक्यातील २९४९४ अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे.