शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: July 28, 2014 00:13 IST

अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा

अकोला : मध्य प्रदेश व अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना रविवारी जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश आणि अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सपन, पेढी, शहानूर, चंद्रभागा आणि पूर्णा या पाच नद्यांना रविवारी पूर आला. तसेच चांदूर बाजार जवळील विसरोळी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आल्याने, पूर्णा नदीला पूर आला. पूर्णेला पूर आल्याच्या स्थितीत अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम पुलावरून पाणी वाहणार असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प होणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगितले. त्याच प्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातही पूर्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. तसेच संबंधित प्रशासनाने व तलाठी यांनी मुख्यालयीच थांबावे, अशा सूचना बुलडाण्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील वान प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत असून, अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील इसरोळी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पाचे पाणी पूर्णा नदीच्या पात्रात येते. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाऊस जास्त झाल्यास अजूनही काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पात्रात वाढ होऊन काठावरील गावांना धोका पोहचू शकतो. तरी पूर्णा नदीकाठावरील संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा तसेच मलकापूर तालुक्यातील गावांसह गाळेगाव, मनसगाव, पहूरपूर्णा, भोनगाव, बोडगाव आदी गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी केले आहे.