शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

वरूण राजाच्या साक्षीने बाप्पाला निरोप

By admin | Updated: September 9, 2014 21:14 IST

अकोला येथील गणेश विसर्जन सोहळा उत्साहात.

अकोला : भव्य मिरवणूक, सर्वत्र गुलाल आणि फुलांची उधळण, संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि गणपतीचाअखंड जयजयकार असे भक्तिमय वातावरण आणि वरून बरसणार्‍या पावसाच्या धारा, अशा वातावरणात सोमवारी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या! अशी प्रार्थना करीत भक्तांनी गणरायाचे विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीला सकाळी १0.३0 वाजता जयहिंद चौकातून प्रारंभ झाला. येथे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव गावंडे, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिसन बाजोरिया, हरिदास भदे, महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या हस्ते मिरवणुकीतील पहिला मानाचा बाराभाई गणपतीचे पूजन करण्यात आले. माजी आमदार बबनराव चौधरी, काँग्रेस महानगर अध्यक्ष मदन भरगड, भाजप महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय तापडिया, हरीश आलिमचंदानी, रमाकांत खेतान, अँड. मोतिसिंग मोहता, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, आदी उपस्थित होते. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या राजेश्‍वर गणेशोत्सव मंडळ, तिसर्‍या क्रमांकावरील जागेश्‍वर गणेशोत्सव मंडळ व चौथ्या क्रमांकावरील खोलेश्‍वर मंडळ या मानाच्या गणपतीचेदेखील मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.