शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीसाठी कुलरमध्ये गुंगीच्या औषधाचा वापर

By admin | Updated: May 11, 2015 02:32 IST

अकोला शहराच्या बहुतांश भागात धुमाकूळ.

सचिन राऊत / अकोला : वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी घराबाहेर खिडकीत लावलेल्या कुलरच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकणे आणि नंतर कटरद्वारे घराचा कुलूप कोंडा तोडून मुद्देमालावर हात साफ करण्याचा सपाटा चोरट्यांच्या एका टोळीने गत आठवड्यापासून शहराच्या काही भागात लावला आहे. देशमुख फैल, कीर्तीनगर व लहान उमरी परिसरातील काही घरांमध्ये अशा प्रकारच्या चोरीच्या घटना समोर आल्या असून, काही युवकांनी या चोरट्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांनी युवकांवर दगडफेक करून पोबारा केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री देशमुख फैलमध्ये घडला. शहरातील रेल्वे रुळानजीक असलेल्या भागातच चोरी करण्याचा धडाका चोरट्यांच्या या टोळीने लावला आहे. देशमुख फैलमधील एका डॉक्टरच्या घराबाहेरील कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकल्यानंतर त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील साहित्य या चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी याच परिसरातील भाजीपाल्याच्या ठोक व्यावसायिकाच्या घरातील मोबाइल व रोख रक्कम या टोळीने लंपास केली. हा प्रकार काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी या चोरट्यांचा पाठलाग केला; मात्र चोरट्यांजवळ असलेल्या पिशव्यांमधील दगड या युवकांच्या अंगावर भिरकावून चोरटे देशमुख फैलमधून पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांची ही टोळी एक पिशवी सोबत ठेवत असून, यामध्ये रेल्वे रुळावरील दगड, दरवाजा तोडण्यासाठी कटर, धारदार शस्त्र, दोरीचा समावेश असल्याची माहिती या चोरट्यांचा पाठलाग करणार्‍या काही युवकांनी दिली. चोरट्यांच्या या टोळीने अजब-गजब फंडे वापरून चोरीचे सत्रच सुरू केले असून, त्यांनी एका आठवड्यात चार ते पाच घरातील मुद्देमालावर हात साफ केल्याची माहिती आहे.