चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य; युवक फरार

By Admin | Updated: May 25, 2014 01:04 IST2014-05-25T01:02:20+5:302014-05-25T01:04:30+5:30

५ वर्षीय चिमुकल्यासोबत अश्लील चाळे करणार्‍या युवकाविरुद्ध आकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Unnatural act with a pinch; Youth absconding | चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य; युवक फरार

चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य; युवक फरार

अकोला : ५ वर्षीय चिमुकल्यासोबत अश्लील चाळे करणार्‍या युवकाविरुद्ध आकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. घटनास्थळावरून आरोपी युवक फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आकोट फैल परिसरात राहणारा अक्षय मोरे (१८) हा त्यांच्या घरी आला आणि त्यांच्या पाच वर्षीय मुलाला बाहेर फिरायला नेत असल्याचे सांगितले आणि मुलाला तो बाहेर घेऊन गेला. त्यानंतर काही वेळाने मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने मुलाची आई आरोपी अक्षय याच्या घरी पोहोचली. घरामध्ये अक्षय मोरे हा मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे दिसून आले. मुलाच्या आईच्या तक्रारीनुसार आकोट फैल पोलिसांनी आरोपी अक्षय मोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

Web Title: Unnatural act with a pinch; Youth absconding