शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

बेराजगार युवकांची तब्बल एक कोटी रुपयांनी फसवणुकीचा अंदाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:42 IST

आरोपींनी जिल्ह्यातील अनेक युवकांची तब्बल एक कोटी रुपयांच्यावर फसवणूक केली आहे.

अकोला: सुशिक्षित बेरोजगार युवकांना भूलथापा देऊन समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ५५ लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक करणाऱ्या चौघांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. आरोपींनी जिल्ह्यातील अनेक युवकांची तब्बल एक कोटी रुपयांच्यावर फसवणूक केली आहे. दररोज फसवणुकीच्या तक्रारी खदान पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. पोलिसांनी बनावट कागदपत्रे बनविणाºया रेहान खान यास ताब्यात घेतले आहे.खडकीतील आरोपी प्रवीण सुरवाडे, नीतेश खिल्लारे, बळीराम गवई आणि संध्या सुरवाडे यांनी ग्रामीण भागातील अनेक युवकांना समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले आणि अनेकांकडून ५५ लाख रुपये लाटले. एवढेच नाही, तर या युवकांना मंत्रालयातून बनावट आॅर्डरसुद्धा आणून दिल्या. संबंधित युवक रुजू होणाºया ठिकाणी गेले असता, त्या ठिकाणी कोणतीही आश्रमशाळा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर युवकांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी प्रवीण सुरवाडे, नीतेश खिल्लारे यांना अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी फसवणूक केल्याच्या आणखी काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. शुक्रवारी डाबकी रोडवरील प्रशीक शिवचरण सिरसाट याने आरोपींनी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दिली. सोबतच त्याने आरोपीने दिलेली बनावट आॅर्डरसुद्धा तक्रारीसोबत जोडली आहे.   बनावट आॅर्डरवर राजमुद्रेचा गैरवापरआरोपींनी मंत्रालयातून आॅर्डर निघत असल्याने राजमुद्रा असलेली मंत्रालयाची कागदपत्रे आणि आॅर्डरवर राजमुद्रा वापरून गैरवापर केला. त्यामुळे आरोपींवर राजमुद्रेचा गैरवापर केल्याबद्दल कायद्यात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी