शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

वंचित मुलांना आणले शिक्षण प्रवाहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:38 PM

पालकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर शुक्रवारी आठ मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे तात्पुरत्या स्वरूपात दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरणाऱ्या पारधी, वैदू समाजाचे काही लोक खडकीजवळ राहुटी किंवा पाल टाकून राहतात. येथील २0 ते २२ मुले शिक्षणापासून वंचित होती. ही बालकल्याण समितीने हेरून मुलांच्या पालकांना विश्वासात घेऊन या मुलांना खडकीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरती का होईना; परंतु शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यासाठी चाइल्ड लाइन आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे सहकार्य लाभले.खडकी परिसरात पारधी, वैदू समाजाचे काही लोक मजुरीनिमित्ताने आले आहेत. या ठिकाणी राहुटी टाकून हे लोक राहत असून, त्यांच्या राहुट्यांवर २0-२२ लहान मुले आहेत. ही मुले शिक्षणापासून वंचित आहेत. एकही मूल शाळाबाह्य राहू नये, असे शासनाचे धोरण आहे; परंतु या धोरणाला प्राथमिक शिक्षण विभागाकडूनच हरताळ फासल्या जात आहे. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांना काही दिवसांपूर्वी राहुट्यांमधील लहान मुले खेळताना दिसून आली. त्यांनी चौकशी केली असता, ही मुले शाळा आणि शिक्षणापासून वंचित असल्याची माहिती मिळाली. काळजी आणि संरक्षणाची गरज असणाºया मुलांपर्यंत पोहोचून त्यांनी चाइल्ड लाइन व शिक्षण विभागाच्या सहकार्याने या मुलांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पालकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर शुक्रवारी आठ मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे तात्पुरत्या स्वरूपात दाखल केले. या विद्यार्थ्यांना शाळेकडून नवीन शिक्षण हमी कार्ड देण्यात आले. या कामासाठी बालकल्याण समितीच्या सदस्य अ‍ॅड. सुनीता कपिले, प्रीती वाघमारे, चाइल्ड लाइनच्या सेंगर, बाल न्याय मंडळाचे सदस्य संजय सेंगर, शिक्षण विस्तार अधिकारी अश्विन मानकर, मुख्याध्यापिका हिंगणे यांचे सहकार्य लाभले. शाळाबाह्य मुलांबाबत शिक्षण विभाग उदासीनशहरात फिरताना अनेकदा शाळाबाह्य मुले आढळून येतात. या मुलांच्या पालकांना विश्वासात घेऊन शाळेत दाखल करता येते; परंतु याविषयी शाळा आणि शिक्षक उदासीन आहेत. खडकी येथील मुलांच्या बाबतीतसुद्धा असेच घडले. अखेर बालकल्याण समिती सदस्यांनी कायद्याची भाषा वापरल्यावर या मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची तयारी दर्शविली.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी