शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

अघोषित भारनियमनाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: August 21, 2014 19:38 IST

बोरगाव वैराळे परिसरात कालपासून अघोषित भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे परिसरात कालपासून अघोषित भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत १० तासापासून वीज नसल्याने गावकर्‍यांच्या नाकीनऊ आले आहेत. या परिसरातील बोरगाव वैराळे, सोनाळा, दुधाळा, हातरू ण, मंडाळा, लोणाग्रा, खांबोरा या भागात केंव्हाही वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज पुन्हा कधी येईल, याची काहीच श्वाश्वती नसल्याने गावकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पंधरा दिवसांपासून श्रावणसरी या भागात बसरलेल्याच नाहीत. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी आधीच हतबल झाले आहेत. हातरू ण परिसरातील ओलिताचे साधन असलेले शेतकरी पिके जगविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत असले तरी विविध कारणे समोर ठेवून महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. त्यामुळे पाणी असतानाही हतबल होण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ब्रेकडाऊन, इमर्जन्सी, जम्परफाल्ट आदी शब्दाचा वापर करून लाईनमन ते अभियंता शेतकर्‍यांना समजावत आहे. मात्र रोज हे शब्द ऐकून शेतकरी आता त्रस्त झाला आहे. कर्मचारी कमी आणि रोहित्र जास्त अशी अवस्था असल्याने आता भ्रमणध्वनी उचलण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.भारनियमनाच्या वेळेव्यतिरिक्त हे भारनियमन सुरू राहत असल्याने शेतकर्‍यांच्या संतापाच्या उद्रेकाला वीज वितरण कंपनीला समोरे जावे लागत आहे. वीज खंडित झाल्यानंतर पिठगिरण्या बंद पडतात. त्यामुळे बाहेरगावावरू न दळण दळून आणावे लागते. ग्रामीण भागातील भारनियमन कमी करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत असली तरी वीज वितरण अधिकारी याला काहीच प्रतिसाद देत नसल्याने गावकर्‍यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)