शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख क्विंटल तुरीचे मोजमाप बाकी!

By admin | Updated: June 1, 2017 01:29 IST

‘नाफेड’द्वारे खरेदी बंद : शेतकऱ्यांना ‘टोकन’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीची मुदत संपल्याने, बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या पाचही खरेदी केंद्रांवर तूर खरेदी बंद करण्यात आली; मात्र खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या १ लाख ९२ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. मोजमाप बाकी असलेली तूर खरेदी करण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले असून, या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी गत २२ एप्रिल रोजी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी केंद्रांवर मोजमाप बाकी असलेल्या तुरीचे पंचनामे करून शासनामार्फत तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. दरम्यान, गत ९ मेपासून ‘नाफेड’द्वारे पुन्हा तूर खरेदी सुरू करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदीत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर गत २२ एप्रिल ते ३१ मेपर्यंत ८० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदीची मुदत ३१ मे रोजी सायंकाळी संपुष्टात आली. ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीची मुदत संपली असली, तरी खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या १ लाख ९२ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. त्यामुळे मोजमाप बाकी असलेल्या १ लाख ९२ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले आहे. टोकन देण्यात आलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप करण्यात येणार आहे.अकोल्यात पाच हजारांवर प्रतीक्षेत!नाफेडद्वारे तूर खरेदीत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रावर अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील तूर खरेदी करण्यात येत आहे. या केंद्रावर ३१ मेपर्यंत नोंदणी केलेल्या ५ हजार ५०० शेतकऱ्यांच्या १ लाख ३५ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. नाफेडद्वारे तूर खरेदीची मुदत संपल्यानंतर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या ५ हजार ५०० तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘टोकन’ देण्यात आले असून, टोकन दिलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या मात्र मोजमाप बाकी असलेल्या शेतकऱ्यांची १ लाख ९२ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यासाठी ‘टोकन’ देण्यात आले आहेत. टोकन देण्यात आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे.-आस्तिककुमार पांडेय,जिल्हाधिकारी.