शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नाराजांच्या मनधरणीसाठी दोन दिवस

By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघातून २६ अर्ज बाद : आता लक्ष १ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याकडे

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर आज या अर्जांची छानणी करण्यात आली. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील निवडणूक मैदानात असलेले १८६ इच्छुक उमेदवारांपैकी २६ उमेदवारांचे नामांकन अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात आता १६0 उमेदवार आहेत. रद्द झालेल्या अर्जांमध्ये बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून १, चिखली ४, खामगाव ३, जळगाव जामोद ५, मलकापूर २ व मेहकरमध्ये ११ अर्ज रद्द करण्यात आले. रिंगणात उरलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १ ऑक्टोबर ही मुदत आहे. या दोन दिवसात तडजोडी आणि वाटाघाटीच्या राजकारणाला जोर येणार असून, मतविभाजन टाळण्यासाठी अपक्ष तसेच बंडखोरांच्या मनधरणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. जळगाव जामोद मतदार संघात एकूण २८ पैकी आज चार जणांचे अर्ज पक्षाचे एबी फॉर्म जोडले नसल्याने तर एकाचा फॉर्म अर्जावर सही नसल्याने तसेच शपथ पत्रावर वडिलांऐवजी आजोबाचे नाव असल्याने अपात्र ठरविण्यात आला. आता या मतदारसंघात २३ जण कायम आहेत. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात रेखा ताई खेडेकर राष्ट्रवादीकडून, डॉ. शशिकांत खेडेकर शिवसेनेकडून, विनोद वाघ मनसेकडून, डॉ. गणेश मांटे भाजपकडून, प्रदीप नागरे काँग्रेसकडून, वसंतराव मगर बस पाकडून यांनी अर्ज दाखल केले आहेत. मेहकर विधानसभा मतदार संघात ११ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. आता ३३ उमेदवार रिंगणात आहेत. छानणीमध्ये ११ उमेदवार अवैध ठरविण्यात आले आहेत. खामगाव मतदारसंघामध्ये १९ पैकी तिघांचे नामांकन अर्ज त्रुटीमध्ये बाद झाले आहेत. मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. दरम्यान, आज झालेल्या छानणीमध्ये यातील रंजना संतोष बोरकर रा.शेंबा व विश्‍वास रामदास नारखेडे रा.शेंबा या दोघांचे अर्ज त्रुटी असल्याने बाद झाले. त्यामुळे आता या मतदार संघात छानणीनंतर २0 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी दाखल २६ अर्जांपैकी २५ अर्जं वैध ठरले तर एक नामाकंन अर्ज एबी फॉर्म व दहा सूचकांच्या सह्या नसल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये एकुण २७ अर्जांंपैकी ४ अर्ज रद्द ठरविण्यात आले आहेत.