शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली

By admin | Updated: March 10, 2015 02:04 IST

राज्यातील चित्र ; सहा वर्षांत ५७ लाख टन टोमॅटो उत्पादन.

अकोला : राज्यात गत सहा वर्षापासून टोमॅटोचे ५७ लाख टन उत्पादन झाले आहे. परंतु टोमॅटो मागणीच्या तुलनेत उत्पादन, पुरवठा जास्त असल्याने टोमॅटोचे दर कोसळलेले राहत आहेत. परिणामी टोमॅटो उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकर्‍यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. या परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली सापडले आहेत. राज्यातील पीक क्षेत्रातील सुमारे २९ हजार ११0 हेक्टर क्षेत्र हे टोमॅटो लागवडी खालील आहे. खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो उत्पादन घेण्याकडे विदर्भातील शेतकर्‍यांचाही कल वाढला आहे. राज्यात गत सहा वर्षापासून टोमॅटो लागवड क्षेत्रामध्ये दीड पटीने वाढ झाली आहे. राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली या जिल्ह्यांपाठोपाठ पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. सन २00९ पासून राज्यात ५६ लाख ८९ हजार टन टोमॅटोचे उत्पादन घेण्यात आले आहे. टोमॅटोचे उत्पादन मागणीच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकर्‍यांना टोमॅटोची अत्यंत कमी भावात विक्री करावी लागत आहे. टोमॅटो उत्पादनासाठी एकरी सरासरी ७0 हजार रुपये खर्च येत असून, उत्पादन सरासरी पाच ते सहा टन होत आहे. वार्षिक सरासरी १0 ते १२ रुपये किलो दर टोमॅटोला राहत असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकुन देण्याची वेळ येत आहे.