शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टोकन दिले; मोजमाप अडकले!

By admin | Updated: June 15, 2017 01:32 IST

‘नाफेड’द्वारे तूर खरेदी बंद : १५ हजारांवर शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी १० जूनपासून बंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांतर्गत बाजार समित्यांक डून तूर उत्पादक शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असले तरी; जिल्ह्यात ३ लाख ९९ हजार ५१३ क्विंटल तुरीचे मोजमाप अडकले आहे. त्यानुषंगाने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत टोकन देण्यात आलेल्या १६ हजार ८५४ तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीची मुदत गत ३१ मे रोजी संपली होती. त्यानंतर १० जूनपर्यंत तूर खरेदिला मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच खरेदी केंद्रांवर गत १० जूनपर्यंत नाफेडद्वारे तूर खरेदी करण्यात आली. दरम्यान, पाचही कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत जिल्ह्यातील १८ हजार ६४८ तूर उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात आले. १० जूनपासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद झाल्यानंतर, नोंदणी झालेल्या आणि टोकन दिलेल्या १५ हजार ८५४ शेतकऱ्यांच्या ३ लाख ९९ हजार ५१३ क्विंटल तुरीचे मोजमाप आणि खरेदीची प्रक्रिया अडकली आहे. तूर खरेदी बंद करण्यात आल्याने टोकन देण्यात आले असले तरी, तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप रखडले आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदीविना शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याचे वास्तव आहे. या पृष्ठभूमीवर नाफेडद्वारे तूर खरेदी केव्हा सुरु होणार, याबाबत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.जिल्ह्यात ४ लाख क्विंटल तूर खरेदी!गत १६ डिसेंबर ते १० जूनपर्यंत जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे ४ लाख २ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे, तर खरेदी बंद झाल्याने नोंदणी केलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची ३ लाख ९९ हजार ५१३ क्विंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे.‘नाफेड’द्वारे तूर खरेदी १० जूनपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडील ३ लाख ९९ हजार ५१३ क्विंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे.- बजरंग ढाकरेजिल्हा मार्केटिंग अधिकारी