टोकन दिले; मोजमाप अडकले!

By Admin | Updated: June 15, 2017 01:32 IST2017-06-15T01:32:43+5:302017-06-15T01:32:43+5:30

‘नाफेड’द्वारे तूर खरेदी बंद : १५ हजारांवर शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत

Token; Measurement stuck! | टोकन दिले; मोजमाप अडकले!

टोकन दिले; मोजमाप अडकले!

संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी १० जूनपासून बंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांतर्गत बाजार समित्यांक डून तूर उत्पादक शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असले तरी; जिल्ह्यात ३ लाख ९९ हजार ५१३ क्विंटल तुरीचे मोजमाप अडकले आहे. त्यानुषंगाने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत टोकन देण्यात आलेल्या १६ हजार ८५४ तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमी दराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदीची मुदत गत ३१ मे रोजी संपली होती. त्यानंतर १० जूनपर्यंत तूर खरेदिला मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच खरेदी केंद्रांवर गत १० जूनपर्यंत नाफेडद्वारे तूर खरेदी करण्यात आली. दरम्यान, पाचही कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत जिल्ह्यातील १८ हजार ६४८ तूर उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात आले. १० जूनपासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद झाल्यानंतर, नोंदणी झालेल्या आणि टोकन दिलेल्या १५ हजार ८५४ शेतकऱ्यांच्या ३ लाख ९९ हजार ५१३ क्विंटल तुरीचे मोजमाप आणि खरेदीची प्रक्रिया अडकली आहे. तूर खरेदी बंद करण्यात आल्याने टोकन देण्यात आले असले तरी, तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप रखडले आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदीविना शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याचे वास्तव आहे.
या पृष्ठभूमीवर नाफेडद्वारे तूर खरेदी केव्हा सुरु होणार, याबाबत जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्यात ४ लाख क्विंटल तूर खरेदी!
गत १६ डिसेंबर ते १० जूनपर्यंत जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे ४ लाख २ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे, तर खरेदी बंद झाल्याने नोंदणी केलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची ३ लाख ९९ हजार ५१३ क्विंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे.

‘नाफेड’द्वारे तूर खरेदी १० जूनपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडील ३ लाख ९९ हजार ५१३ क्विंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे.
- बजरंग ढाकरे
जिल्हा मार्केटिंग अधिकारी

Web Title: Token; Measurement stuck!