शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागितली!

By admin | Updated: June 16, 2017 00:49 IST

दोन दिवसात माहिती सादर करा : ‘डीडीआर’चे बँकांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफीच्या पृष्ठभूमीवर शासनाच्या सहकार खात्यामार्फत थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागितली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी (डीडीआर) बुधवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना दिले.राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह अटींच्या आधारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. कर्जमाफीच्या पृष्ठभूमीवर गत ३१ मार्च २०१६, ३० जून २०१६ आणि ३१ मार्च २०१७ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचा आदेश राज्याच्या सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकांना दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक जी.जी.मावळे यांनी बुधवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांना दिले. बँकांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सहकार आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.थकबाकीदार शेतकऱ्यांना १० रुपयांपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे निर्देश!थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे निर्देश शासनामार्फत बँकांना देण्यात आले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करून, जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा उपनिब्ांधकांनी गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना दिले.सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आली, तसेच शासनाच्या निर्देशानुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे निर्देशही बँकांना दिले.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक