शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात बियाणे, खताचा पुरवठा वेळेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 10:22 IST

‘लॉकडाऊन’ संपताच सर्वत्र हा पुरवठा केला जाणार आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज असून, दक्षता घेतली जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी ‘लॉकडाऊन’ संचारबंदी लावण्यात आली आहे. या स्थितीत महत्त्वाची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाने बियाणे, खताचे नियोजन केले आहे. ‘लॉकडाऊन’ संपताच सर्वत्र हा पुरवठा केला जाणार आहे. राज्यात खताचे रॅक पाठविण्यात येत आहेत. मलकापूरला १,५०० मेट्रिक टन खताचा रॅक खाली करण्यात आला आहे. राज्यात येत्या खरीप हंगामात १ कोटी ३२ लाख हेक्टरचे नियोजन कृषी आयुक्तालयाने केले असून, त्यासाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयांतर्गत महाराष्ट्र (महाबीज) राज्य बियाणे महामंडळाकडून ५ लाख २८ हजार ५०९ क्विंटल आणि राष्ट्रीय बियाणे (एनएससी) महामंडळाचे २७ हजार २६५ क्विंटल असे ५ लाख ५५ हजार ७७४ क्विंटल बियाण्यांचे हे नियोजन आहे. सद्यस्थिीत बियाणे प्रक्रिया सुरू आहे. ‘लॉकडाऊन’मध्ये कृषी मालाच्या वाहतुकीस परवानगी आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व बियाणे बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत. राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना याबाबत कृषी आयुक्तालयातून सूचना देण्यात आल्या आहेत. बियाणे, खते वाहतुकीची परवागी असल्याने बियाणे उद्योगांजकांना बियाणे पोहोेचविण्याची मोकळीक आहे. दरम्यान, जगावर कोरोनासारखे मोठे संकट आले आहे. देशातही कोरोनाचा प्रसार वाढला आहे. तो थांबविण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहे. देशात ‘लॉकडाऊन’ आहे. अशाही परिस्थिती शेतकºयांना बियाणे मिळावे, यासाठी राज्यात बियाणे प्रक्रियांवर भर दिला जात आहे. मजुरांची या काळात टंचाई आहेच. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना बियाणे, खतांची टंचाई भासणार नाही, याकडे सध्या कृषी आयुक्तालय लक्ष ठेवून आहे.  शेतकºयांना वेळेवर खते, बियाणे देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याची वाहतूक करण्यासाठी परवागी देण्यात आली आहे. मे महिन्याच्या प्रथम व दुसºया आठवड्यात शेतकºयांपर्यंत पुरवठा करण्यात येणार आहे.

- सुहास दिवसे, आयुक्त कृषी (आयएएस), पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी