तिस-या दिवशी जिल्ह्यात १८५ उमेदवारी अर्ज

By Admin | Updated: July 16, 2015 01:37 IST2015-07-16T01:37:10+5:302015-07-16T01:37:10+5:30

सर्वाधिक अर्ज अकोला तालुक्यात.

On the third day, 185 nomination papers for the district | तिस-या दिवशी जिल्ह्यात १८५ उमेदवारी अर्ज

तिस-या दिवशी जिल्ह्यात १८५ उमेदवारी अर्ज

अकोला: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी (बुधवारी) जिल्ह्यात १८५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये अकोला तालुक्यात सर्वाधिक ५४ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ह्यऑनलाइनह्ण उमेदवारी अर्ज भरणे आणि ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची ह्यप्रिंटह्ण तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करण्याची प्रक्रिया सोमवार, १३ जुलैपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी बुधवारी जिल्ह्यातील सातही तालुक्यात एकूण १८५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

Web Title: On the third day, 185 nomination papers for the district