‘स्वाइन फ्लू’ संशयित महिलेचा मृत्यू, अकोला जिल्ह्यातील दुसरा बळी

By Admin | Updated: March 3, 2015 01:11 IST2015-03-03T01:11:52+5:302015-03-03T01:11:52+5:30

४0 वर्षीय महिलेचा सोमवारी रात्री सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

'Swine Flu' death of suspected woman, second victim of Akola district | ‘स्वाइन फ्लू’ संशयित महिलेचा मृत्यू, अकोला जिल्ह्यातील दुसरा बळी

‘स्वाइन फ्लू’ संशयित महिलेचा मृत्यू, अकोला जिल्ह्यातील दुसरा बळी

अकोला- स्वाइन फ्लू संशयित असलेल्या आकोट फैलमधील इंदिरानगर येथील एका ४0 वर्षीय महिलेचा सोमवारी रात्री सवरेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वाइन फ्लू संशयित म्हणून या महिलेला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खाल्यावल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले; परंतु रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यभर खळबळ माजविणार्‍या ह्यस्वाइन फ्लूह्णमुळे अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी जानराव मुळे यांचा रविवारी मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आकोट फैल इंदिरानगर येथील रहिवासी ज्योती रवि बल्लाळ (४0) यांना स्वाइन फ्लूच्या संशयावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. स्वाइन फ्लू असल्याच्या संशय आल्याने या महिलेचे नमुने घेऊन त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू होते, मात्र सायंकाळी प्रकृती प्रचंड खाल्यावल्याने ज्योती बल्लाळ यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. सोमवारी रात्री त्यांच्यावर उपचार सुरू असताना ८ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ज्योती बल्लाळ यांना स्वाइन फ्लू संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र ज्योती बल्लाळ यांच्या ह्यस्वाबह्ण व रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. रविवारी जानराव मुळे यांचा तर सोमवारी ज्योती बल्लाळ यांचा स्वाइन फ्लू संशयित म्हणून मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच बल्लाळ यांच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

Web Title: 'Swine Flu' death of suspected woman, second victim of Akola district